जाहिरात

Viral Video : 2.67 लाख पगार अन् खर्च फक्त 40 हजार; मुंबईकर तरुणीच्या खर्चाचा तपशील पाहून सगळेच चकीत!

Instragram Viral Video : अनहद नावाच्या तरुणीने  @an_had_fun_ नावात्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video : 2.67 लाख पगार अन् खर्च फक्त 40 हजार; मुंबईकर तरुणीच्या खर्चाचा तपशील पाहून सगळेच चकीत!

Viral Video : मुंबईतील एक तरुणी जी स्वतःला "सोबो गर्ल" म्हणवते तिने तिचे मासिक उत्पन्न आणि खर्च याबाबत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अनहद नावाच्या तरुणीने  @an_had_fun_ नावात्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनहद, एक मार्केटिंग जॉब करते, ज्यातून ती दरमाह 2 लाख 67  हजार रुपये कमावते. तिने तिच्या मासिक खर्चाचा तपशील सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला, जे सहसा कुणी सांगत नाही. यावेळी तिने ती तिच्या पालकांसोबत राहते, त्यामुळे तिला भाडे किंवा किराणा सामानासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत, हे स्पष्ट केले. 

अनहदचा जून महिन्याच्या खर्चाचा तपशील

अनहद सांगितलं की, ती दरमहा 2.67 लाख रुपये कमावते. यातील 1 लाख 80 हजार रुपये थेट एसआयपी (SIPs) मध्ये गुंतवते. उरलेले पैसे एसआयपी नंतर तिच्याकडे दरमहा 87,000 रुपये शिल्लक राहतात. ज्यापैकी तिचा सर्वाधिक खर्च बाहेर जेवणासाठी होतो 16,000 रुपये (जून महिन्यासाठी) आहे. मजा-मस्तीसाठी 8,500 रुपये ज्यात चित्रपट, बाहेर फिरणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये एका रात्रीच्या बाहेर जाण्याचा खर्च समाविष्ट आहे.

(नक्की वाचा-  Viral video: बाईंचा वेगळाच पॅटर्न, शिक्षिकेचा चिमुकल्यांसह भन्नाट डान्स)

स्वतःची काळजी घेण्यासाठी  8,500 रुपये खर्च केले. तर स्विगी 3400 रुपये, पुस्तके 1300 रुपये, टेनिस 600 रुपये, उबर 600 रुपये या देखील खर्चाचा समावेश आहे.  सर्व खर्चानंतर तिच्याकडे 47,000 रुपये शिल्लक राहतात, जे ती "मिस्ट्री फंड" मध्ये जमा करते. या फंडाबाबत तिने अजून तपशील दिले नाहीत, पण ती लवकरच याबाबत सांगणार असल्याचे तिने म्हटले.

व्हिडीओला 1.1 मिलियन व्ह्यूज

अनहद हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असून याता आतापर्यंत 1.1 मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि 36,500 पेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत. अनेकांना तिच्या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिचे वर्णन "अवास्तव" आणि "सर्वसामान्यांसाठी असंबंधित" असे केले. त्यांचे म्हणणे आहे की भाडे आणि किराणा यांसारखे मोठे खर्च नसल्यामुळे तिचे जीवन सर्वसामान्य मुंबईकरांपेक्षा खूप वेगळे आहे.

(नक्की वाचा-  Urine Eye Wash : स्वमुत्राने डोळे धुण्याचा नवा ट्रेंड! पुण्यातील महिलेचा मोठा दावा, अनुकरण करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला)

युजर्सच्या संमिश्र कमेंट्स

काहींनी तिचे समर्थन केले आणि तिच्या खर्चाच्या सवयींचे कौतुक केले. एका युजरने लिहिले, "ती तिच्या पगाराचा फक्त 20 टक्क्यांपेक्षा कमी खर्च करते आणि तरीही कमेंटमध्ये लोक तिला ट्रोल करत आहेत." दुसऱ्या युजरने लिहिले की, "लोक तुझ्या खर्चाला अवास्तव का म्हणत आहेत? प्रत्येकाची परिस्थिती, कुटुंब आणि जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. तू हे सांगितले नाही की प्रत्येकाने असेच खर्च करावे."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com