Video: "लग्नानंतरही पासवर्ड..", बेडरूम उघडलं नाही, नवीन घराचं बाथरूम पाहून Youtuber सौरव जोशीची पत्नी थक्क

यूट्यूबर सौरव जोशीची पत्नी अवंतिका जोशीला त्यांचं नवं घर पाहून आश्चर्याचा धक्का बसला. व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा रंगली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Saurabh Joshi And Avantika Bhatt Viral Video

Saurav Joshi And Avantika Joshi Viral Video : सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर त्यांच्या जीवनातील खास क्षणांचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी देत असतात. नवं घर खरेदी केल्यावर या सेलिब्रिटींचा आनंद गगनात मावत नाही. घरात प्रवेश करताच ते कॅमेरासमोर झळकतात आणि त्यांच्या फॉलोअर्सला याबाबत माहिती सांगतात. यूट्यूबर सौरव जोशी आणि त्यांची पत्नी अवंतिका भट्ट यांचाही एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ते दोघेही नवीन घरात एन्ट्री करत असल्याचं व्हिडीओता पाहायला मिळत आहे. सौरव जोशी त्याच्या पत्नीला घर दाखवतो. पण बेडरूम दाखवत असताना असं काही घडतं, जे पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्काच बसेल.

नवीन घराचं बेडरूम उघडलं नाही 

व्हिडिओमध्ये दिसतंय की, अवंतिका जोशी बेडरूमचं दार उघडण्याचा प्रयत्न करते, पण ते दार उघडत नाही. कारण त्या रुममध्ये पासवर्ड आणि फिंगरप्रिंट लॉक सिस्टम बसवलेलं असतं. त्यानंतर सौरव स्वतः दार उघडतो आणि हसत हसत म्हणतो की, लवकरच तो अवंतिकाचा फिंगरप्रिंटही सिस्टममध्ये जोडणार आहे.

नक्की वाचा >> छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा 'बालेकिल्ला' ढासळणार? कशी आहेत युती-आघाड्यांची राजकीय गणितं? वाचा एका क्लिकवर

बाथरूम पाहून अवंतिका झाली थक्क

बेडरूमनंतर जेव्हा अवंतिका बाथरूम पाहते,तेव्हा त्याची शानदार रचना पाहून ती थक्क होते. लक्झरी इंटीरियर, मॉडर्न डिझाइन आणि सुविधा पाहून ती जशी रिअॅक्शन देते, ते पाहून लोकांच्या भुवया उंचावतात. जोशी कपलच्या या व्हिडीओची प्रचंड चर्चा रंगली असून व्हिडीओवर प्रतिक्रियांचा वर्षावही होत आहे. सौरव जोशी आणि अवंतिका भट्ट यांचं लग्न नुकतंच पार पडलंय. लग्नानंतर दोघे दुबई आणि अबू धाबीला फिरायला गेले होते. परत आल्यानंतर त्यांनी नवीन घराचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Jalgaon News मित्राचा मित्रानेच काटा काढला! पोत्यात मृतदेह भरून तलावात टाकला, आरोपी गुजरातला गेले अन् नंतर..

व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे आणि आतापर्यंत या व्हिडीओला 22 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 49 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सौरव-अवंतिकाचं कौतुक केलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने याला ‘ड्रीम हाऊस' असं म्हटलं आहे. तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटलंय की, ‘आता तर लग्नानंतरही पासवर्ड लागतोय'. तर अनेकजण अवंतिकाच्या क्यूट रिअॅक्शनवर हार्ट इमोजी शेअर करत आहेत.