नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठा विमान अपघात (plane crash in Kathmandu) झाला आहे. त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान उड्डाण करताना संतुलन बिघडल्याने जमिनीवर कोसळलं आणि विमानाला आग लागली. विमानात पायलटसह 19 जणं होतं. यातील 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. जो पाहून हा अपघात किती भयावह होता हे लक्षात येऊ शकतं. विमानाने टेकऑफ केल्यानंतर संतुलन बिघडलं आणि यानंतर विमान जमिनीवर कोसळलं.
जमिनीवर कोसळताच विमानाला लागली आग
त्रिभुवन विमानतळावरून विमान उड्डाण करीत होते.हे विमान काठमांडूवरून पोखराच्या दिशेने जात होतं. शौर्य एअरलाइन्सच्या या विमानात एकूण 19 प्रवासी होते. विमानाने रनवेवरून उड्डाण घेतलं, तोपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र काही मिनिटांनंतर विमानाचं संतुलन बिघडलं आणि विमान जोरात जमिनीवर कोसळलं.
नक्की वाचा - नेपाळच्या काठमांडूमध्ये प्रवासी विमान कोसळलं, 19 प्रवाशांचा जीव धोक्यात
मिळालेल्या माहितीनुसार, शौर्य एअरलाइन्सचं हे विमान इंजिन परीक्षणासाठी पोखराला घेऊन चालले होते. विमानाची पूर्ण तपासणी (सी-चेक) करण्यासाठी पोखराला घेऊन जात होते. या विमानात 9एन-एएमईमध्ये 19 प्रवासी होते. नेपाळ नागरिक उड्डाण प्राधिकरणानुसार, या विमानात शौर्य एअरलाइन्समधील इंजिनियर आणि तंत्रज्ञ होते. तब्बल महिनाभर विमानाचा वापर करण्यात आला होता.