हेलिकॉप्टरची अचानक तपासणी, सैनिकांच्या अंधारातील कवायती पाहून अधिकारी हादरले

मीडिया रिपोर्ट्सनुसार,लष्करी हेलिकॉप्टरची किंमत 8.5 मिलियन युरो म्हणजेच अंदाजे 75 कोटी रुपये आहे आणि ते 30 मिमी तोफ आणि हेलफायर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
The chopper they were caught in belonged to Army Air Corps' 653 Squadron (Representational)

ब्रिटनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सैनिक लष्करी हेलिकॉप्टरमध्ये नको त्या अवस्थेत आढळून आले. घटनेच्या वेळी दोन्ही जवान मद्यधुंद अवस्थेत होते. लष्करी प्रशिक्षण क्षेत्रात लष्करी अपाचे हेलिकॉप्टरच्या काही असामान्य हालचाली दिसल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आले. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अपाचे हेलिकॉप्टरबाबत संशय आल्याने इतर सैनिकांनी त्याचा तपास घेतला. हेलिकॉप्टरजवळ गेल्यावर समोरील दृश्य पाहून इतर सैनिक चक्रावून गेले. हेलिकॉप्टरमध्ये दोन सैनिक शारीरिक संबंध ठेवत असल्याचे त्यांना आढळून आले. दोन्ही ब्रिटिश सैनिक मद्यधुंद अवस्थेत होते. 

नक्की वाचा :ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात फॉक्स न्यूजचा वृत्तनिवेदक बनणार संरक्षणमंत्री?

मीडिया रिपोर्ट्सनुसार,लष्करी हेलिकॉप्टरची किंमत 8.5 मिलियन युरो म्हणजेच अंदाजे 75 कोटी रुपये आहे आणि ते 30 मिमी तोफ आणि हेलफायर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. त्यावेळी ग्राउंड स्टाफ लष्करी हेलिकॉप्टरची सर्व्हिस करत होता. मग अचानक रात्रीच्या वेळी त्याला रोटरमध्ये काही असामान्य हालचाली दिसल्या. कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरमधून विचित्र आवाजही ऐकू येत होता. 

नक्की वाचा :'PM मोदींना नोबेल शांतता पुरस्कार द्या', दिग्गज गुंतवणूकतज्ज्ञांनी केली मागणी

त्यावेळी हेलिकॉप्टरच्या मागील कॉकपिटमध्ये दोन सैनिक महिलांसोबत मद्यधुंद अवस्थेत लैंगिक संबंध ठेवताना आढळले. सैनिक लष्कराच्या गणवेशात होते. दोन्ही सैनिकांना पकडल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरमधून बाहेर येण्यास आणि कपडे घालण्यास सांगण्यात आले. नॉर्थम्बरलँडमधील ऑटरबर्न रेंजमध्ये 2016 मध्ये ही घटना घडली होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे अलीकडेच ही घटना उघड झाली. 

Advertisement
Topics mentioned in this article