Iran Vs Israel-US War: इराण-अमेरिका यु्द्ध थांबणार? आखातातील आग विझणार, हे आहेत 5 संकेत

Iran-US-Israel War: इराण-इस्रायल युद्धाच्या 12 दिवसांनंतर आता युद्धविरामाचे 5 संकेत मिळत आहेत. अमेरिकेचे आर्थिक नुकसान आणि ट्रम्प-पुतीन यांची चर्चा यामुळे आखातातील आग विझण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

इराण-अमेरिका इस्रायल युद्धाचा वणवा आता शमणार अशी चिन्हे दिसत आहेत. 13 दिवसांचा रक्तपात्र, 1200 पेक्षा जास्त बळी आणि अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेचे वारे वाहू लागले आहेत. डोनाल्ड ट्रम्प, बेंजामिन नेतान्याहू आणि इराणचे नवे वारसदार मोज्तबा खामेनी या तिघांच्या निर्णयावर आता जगाचे लक्ष लागले आहे.

इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता एका अशा टप्प्यावर पोहोचले आहे जिथे दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात हानी प्रचंड झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच केलेल्या विधानांनंतर हे युद्ध लवकरच संपेल असे संकेत मिळत आहेत.

Advertisement

1. अमेरिकेचा 'मिशन अकम्प्लिश्ड'चा पवित्रा

डोनाल्ड ट्रम्प यांनी मियामीमधील बैठकीत इराणचे कंबरडे मोडल्याचा दावा केला आहे. इराणचे 90% मिसाईल लॉन्चर्स आणि 83% ड्रोन लॉन्चर्स नष्ट केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. इराणच्या 40 युद्धनौकांना जलसमाधी दिल्याने आता इराणची शक्ती क्षीण झाल्याचा अमेरिकेचा दावा आहे. स्वतःचा विजय घोषित करून ट्रम्प आता युद्धातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत.

2. ट्रम्प-पुतीन यांच्यातील 'ती' फोन चर्चा

युद्धाच्या काळात प्रथमच रशिया आणि अमेरिकेच्या प्रमुखांनी तासभर चर्चा केली. ट्रम्प आणि पुतीन यांनी युद्ध लवकर थांबवण्यावर चर्चा केल्याचे समजते. रशियाचे इराणशी असलेले संबंध पाहता, पुतीन यांची भूमिका युद्ध थांबवण्यासाठी कळीची ठरू शकते.

(नक्की वाचा- Iran War: परराष्ट्रमंत्र्यांच्या एका फोनमुळे मोठा दिलासा; 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'मधून भारतीय जहाजांना परवानगी)

3. अमेरिकेचा प्लॅन 'बी' फसला

इराणमध्ये सत्ताबदलाचे अमेरिकेचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही.  इराणच्या जनतेने खामेनींविरुद्ध बंडखोरी केली नाही. अयातुल्ला खामेनींनंतर मोज्तबा खामेनी यांनी सत्ता घट्ट पकडली आहे. कुर्दिश सैनिकांनीही अमेरिकेला अपेक्षित साथ न दिल्याने इराणला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न फसला आहे.

4. युद्धाचा प्रचंड आर्थिक खर्च

अमेरिकेसाठी हे युद्ध आर्थिकदृष्ट्या डोकेदुखी ठरत आहे. 10 दिवसांत 10.35 अब्ज डॉलर्स खर्च झाले, जे अमेरिकेच्या 2026 च्या बजेटच्या 1% आहे. ब्रेंट क्रूड 119 डॉलर्स प्रति बॅरलवर गेल्याने अमेरिकेतील महागाई दर 3.7 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची भीती आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Iran Israel US War: युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या 3 अटी; डोनाल्ड ट्रम्प मान्य करणार?)

5. इराणची लवचिक भूमिका

इराणने 10 वर्षे लढण्याची तयारी असल्याचे म्हटले असले तरी, त्यांची मुख्य अट 'हल्ले थांबवा' हीच आहे. "जर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले थांबवले, तर आम्हीही करणार नाही," असे इराणने स्पष्ट केले आहे. म्हणजेच, इराणलाही आता हे युद्ध लांबवण्यात रस नाही.

युद्ध थांबण्याचे संकेत असले तरी, नेतान्याहू, ट्रम्प आणि मोज्तबा खामेनी यांच्यात थेट संवादाचा अभाव आहे. तसेच, संपूर्ण आखातात भडकलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक देशांना एकाच वेळी शांत करणे हे मोठे आव्हान असणार आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article