जाहिरात

Iran Israel US War: युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या 3 अटी; डोनाल्ड ट्रम्प मान्य करणार?

Iran Israel US War: इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिका आणि इस्रायलसोबतचे युद्ध संपवण्यासाठी तीन प्रमुख अटी जाहीर केल्या आहेत. यामध्ये नुकसानभरपाई आणि आंतरराष्ट्रीय हमीचा समावेश आहे.

Iran Israel US War: युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या 3 अटी; डोनाल्ड ट्रम्प मान्य करणार?

मध्य आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने प्रथमच शांततेसाठी आपल्या अटी जगासमोर ठेवल्या आहेत. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिका आणि इस्रायलसोबतचा संघर्ष संपवण्यासाठी तीन प्रमुख अटी जाहीर केल्या आहेत. पेझेश्कियान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर ही माहिती दिली.

(नक्की वाचा- Iran War: परराष्ट्रमंत्र्यांच्या एका फोनमुळे मोठा दिलासा; 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'मधून भारतीय जहाजांना परवानगी)

इराणच्या 3 मुख्य अटी

मसूद पेझेश्कियान यांच्या मते, युद्ध थांबवण्यासाठी खालील बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे:

  1. कायदेशीर अधिकारांची मान्यता: इराणच्या सार्वभौमत्वाचा आणि कायदेशीर अधिकारांचा स्वीकार करणे.
  2. नुकसानभरपाई : युद्धामुळे इराणचे जे काही नुकसान झाले आहे, त्याची भरपाई अमेरिका आणि इस्रायलने द्यावी.
  3. आंतरराष्ट्रीय हमी: भविष्यात इराणवर कोणताही हल्ला होणार नाही, याची ठोस आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅरंटी (हमी) देण्यात यावी.

पेझेश्कियान यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, "झिओनिस्ट राजवट (इस्रायल) आणि अमेरिकेने हे युद्ध भडकवले आहे आणि ते संपवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे."

Latest and Breaking News on NDTV

(नक्की वाचा- फारुख अब्दुल्ला यांच्यावर जीवघेणा हल्ला! लग्नसमारंभात गोळीबार; थरारक घटनेचा VIDEO समोर)

इराणी लष्कराचा अमेरिकेला इशारा

एककीडे अध्यक्ष शांततेच्या अटी मांडत असताना, दुसरीकडे इराणच्या सशस्त्र दलाचे प्रवक्ते अबोलफजल शेकरची यांनी कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले की, "जर अमेरिकेने इराणच्या बंदरांना किंवा आर्थिक केंद्रांना लक्ष्य केले, तर पर्शियन गल्फमधील कोणतेही बंदर किंवा ठिकाण आमच्या कक्षेबाहेर नसेल. आम्ही आतापर्यंत केलेल्या कारवाईपेक्षा अधिक भीषण हल्ला करू."

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com