जाहिरात

मक्केत 68 भारतीय हजयात्रेकरूंचा मृत्यू; तापमान 51.8 अंश सेल्सिअस अन् मृतांचा आकडा 600 पार

भीषण उष्णतेमुळे मक्कामध्ये हजदरम्यान 600 हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे.

मक्केत 68 भारतीय हजयात्रेकरूंचा मृत्यू; तापमान 51.8 अंश सेल्सिअस अन् मृतांचा आकडा 600 पार
रियाद:

एकीकडे भारतात यंदा रेकॉर्ड तोड उष्णता पाहायला मिळाली. दुसरीकडे सौदी अरबमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. यंदा 12 ते 19 जूनदरम्यान हज यात्रा केली जाते. सोमवारी 17 जून रोजी मक्का की ग्रँड मशिदीत 51.8 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. सौदी अरबच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मक्केत जलवायू परिवर्तनाचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. येथे दर 10 वर्षात सर्वसाधारपणे तापमानात 0.4 डिग्री सेल्सिअसची वाढ झाली आहे. 

भीषण उष्णतेमुळे मक्कामध्ये हजदरम्यान 600 हून अधिक  यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. ज्यात 68 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. हज यात्रादरम्यान 68 भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. ज्यात एकूण मृतांचा आकडा 600 हून अधिक झाला आहे. मृतांमध्ये अधिकांश ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. 

नक्की वाचा - राजधानी दिल्ली उष्णतेनं का होरपळतीय? महानगरांमध्ये उकाडा का वाढलाय? 'हे' आहे मोठं कारण

मक्केत इजिप्तचे 323 आणि 60 जॉर्डन नागरिकांचा मृत्यू
अरबमधील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये इजिप्तचे 323 आणि 60 जॉर्डन नागरिकांचा समावेश आहे. इजिप्तमधील नागरिकांच्या मृत्यूमागे उष्मा हे कारण आहे. याव्यतिरिक्त इंडोनेशिया, इराण, सेनेगल, ट्युनीशियासह इतर देशातील नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. एएफपीनुसार आतापर्यंत एकूण 645 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी 200 हून भाविकांचा मृत्यू झाला होता, ज्यात अधिकांश नागरिक इंडोनेशियाचे होते. 

काही भारतीय नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती
मक्केत गेलेले काही भारतीय भाविक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. मात्र त्यांनी नेमका आकडा सांगितला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून भीषण उष्णतेत हज यात्रेचं आयोजन केलं जातं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com