US Visa : भारतीय विद्यार्थी चिंतेत, ट्रम्प प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या व्हिजा मुलाखतीवर बंदी

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना व्हिजा मिळणेसाठी मुलाखत घेणं बंद कराव्या अशा सूचना ट्रम्प प्रशासनाकडून जगभरातील अमेरिकन दूतावासांना देण्यात आल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 1 min

ट्रम्प प्रशासनाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना व्हिजा मिळणेसाठी मुलाखत घेणं बंद कराव्या अशा सूचना ट्रम्प प्रशासनाकडून जगभरातील अमेरिकन दूतावासांना देण्यात आल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाकडून अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या  परदेशी विद्यार्थ्यांचे सोशल मीडिया चेकिंग अनिवार्य करण्याचा विचार करत असल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भात 27 मे रोजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या पत्रानुसार, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी होईपर्यंत विद्यार्थी (एफएम) आणि एक्सचेंज व्हिजिटर यांच्या (जे) व्हिसा मुलाखतींसाठी नवीन तारखा देण्यात येणार नाहीत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विविध देशांमधून अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. NAFSA असोसिएशननुसार, गेल्या वर्षी अमेरिकेत दहा लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेत साधारण 43.8 बिलियन डॉलरच योगदान देण्यात आलं आहे. 

Advertisement

नक्की वाचा - फ्रान्सच्या अध्यक्षांना पत्नीनं खरंच थोबाडीत मारली? जगभरात चर्चा झाल्यानंतर सरकारकडून स्पष्टीकरण

सोशल मीडियाचा तपास आवश्यक...
वृत्त संस्थांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, अमेरिकन  प्रशासन प्रत्येक परदेशी विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी विशेषतः इस्रायलविरोधी निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांची सखोल चौकशी करू इच्छित आहे.

त्यामुळे व्हिसा प्रक्रिया मंदावू शकते आणि अमेरिकन विद्यापीठाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. कारण अमेरिकन विद्यापीठ परदेशातील विद्यार्थ्यांवर बऱ्याच अंशी अवलंबून असतात.