राजकीय नेत्यांची हत्या, मंदिरे निशाण्यावर, पोलीस-लष्कर हतबल... बांगलादेशातील थरकाप उडवणारी स्थिती

भारत सरकारने आम्हाला मदत करावी. बांगलादेशमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. पोलीस स्टेशन्स रिकामे आहेत.  सैन्यदल देखील कार्यरत नाही. बांगालादेशमधील हिंदू, बौद्ध, खिश्चन नागरिक अस्वस्थ आहेत, असं चारु चंद्र दास म्हणाले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, NDTV मराठी

बांगलादेशमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. शेख हसीना यांचा पक्ष अवामी दलाच्या नेत्यांना आता टार्गेट केलं जात असल्याची माहिती समोर येत आहे. आंदोलकांकडून मंदिरे आणि हिंदू नागरिकांवर देखील हल्ले चढवले जात आहेत. हिंदूंच्या घरांना, व्यापारी आस्थापनांना लक्ष केलं जात आहे. अनेक मुस्लीम घरांचेही नुकसान केले आहे,  बांगलादेशमधील इस्कॉन टेम्पलचे जनरल सेक्रेटरी चारु चंद्र दास यांनी तेथील भयानक स्थितीची माहिती दिली. चारु चंद्र दास यांनी 'एनडीटीव्ही मराठी'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ही माहिती दिली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चितगाव येथील इस्कॉन मंदिराची  तोडफोड झाली आहे.  हिंदूंच्या घरांना, व्यापारी आस्थापनांना लक्ष केले जात आहे.  अनेक मुस्लीम नागरिकांच्या घरांचेही नुकसान केले आहे. या तोडफडीमध्ये विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्याचा, नेत्यांचा समावेश नसून काही समाज विघातक घटक हिंदूंच्या विरोधात तोडफोड करत आहेत. परंतु अनेक मुस्लीम आमच्या घरांचे आणि मंदिराचे रक्षण करत आहेत,  असं देखील चारु चंद्र दास यांनी सांगितलं.

भारत सरकारने आम्हाला मदत करावी. बांगलादेशमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. पोलीस स्टेशन्स रिकामे आहेत.  सैन्यदल देखील कार्यरत नाही. बांगालादेशमधील हिंदू, बौद्ध, खिश्चन नागरिक अस्वस्थ आहेत, असं चारु चंद्र दास म्हणाले. 

(नक्की वाचा- Bangladesh Violence : बांगलादेशमधील हिंसाचाराचं कारण काय? कशी आहे आरक्षण कोटा पद्धत?)

हिंदूंना केलं जातंय टार्गेट

चितगाव येथील इस्कॉन मंदिराची  तोडफोड झाली आहे.  हिंदूंच्या घरांना, व्यापारी आस्थापनांना लक्ष केले जात आहे.  अनेक मुस्लीम नागरिकांच्या घरांचेही नुकसान केले आहे. या तोडफडीमध्ये विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्याचा, नेत्यांचा समावेश नसून काही समाज विघातक घटक हिंदूंच्या विरोधात तोडफोड करत आहेत. परंतु अनेक मुस्लीम आमच्या घरांचे आणि मंदिराचे रक्षण करत आहेत,  असं देखील चारु चंद्र दास यांनी सांगितलं.

Advertisement

भारत सरकारने आम्हाला मदत करावी. बांगलादेशमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. पोलीस स्टेशन्स रिकामे आहेत.  सैन्यदल देखील कार्यरत नाही. बांगालादेशमधील हिंदू, बौद्ध, खिश्चन नागरिक अस्वस्थ आहेत, असं चारु चंद्र दास म्हणाले. 

(नक्की वाचा - बांगलादेश पेटवला, हिंदूंवर अत्याचार; भारताची डोकेदुखी ठरणारा 'जमात-ए-इस्लामी' पक्ष फ्रंटफूटवर)

29 नेत्यांची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील हिंसाचारात आतापर्यंत 440 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेशात अवामी लीग आणि त्याच्या सहयोगी पक्षांशी संबंधित किमान 29 नेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या झाल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये यामध्ये अभिनेता शांतो खान आणि त्याचे वडील सलीम खान यांचाही समावेश आहे. सलीम हे अवामी लीग पक्षाशी संबंधित होते.

Advertisement