US Election : अमेरिकेतील निवडणुकीत भारताची छाप; बॅलेट पेपरवर दिसणार 'ही' भारतीय भाषा

मतपत्रिकेवर बंगाली भाषेचा समावेश करणे ही केवळ शिष्टाचार नसून कायदेशीर गरज असल्याचे मायकेल जे रायन म्हणाले. कायद्यानुसार न्यूयॉर्क शहरातील काही मतदान केंद्रांना बंगालीमध्ये मतदान साहित्य देणे आवश्यक आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमेरिकेत 5  नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडत आहेत. अमेरिकेतील या निवडणुकीतही भारताची छाप दिसून येत आहे. यावेळी न्यूयॉर्कमधील निवडणुकीच्या मतपत्रिकेवर भारतीय भाषाही पाहायला मिळतील. उमेदवारांची नावे भारताची भाषा असलेल्या बंगालीमध्ये मतपत्रिकेवर लिहिली जातील. शहर नियोजन विभागाच्या म्हणण्यानुसार, न्यूयॉर्कमध्ये 200 हून अधिक भाषा बोलल्या जातात, परंतु निवडणुकीत इंग्रजीशिवाय इतर चार भाषाही मतपत्रिकेवर असतील. यामध्ये बंगाली भाषेचा समावेश करण्यात आला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यूएस बोर्ड ऑफ इलेक्शन्स एनवायसीचे कार्यकारी संचालक मायकेल जे रायन यांनी सांगितले की, मतपत्रिकेवर इंग्रजीशिवाय इतर चार भाषा असतील. यामध्ये चीनी, स्पॅनिश, कोरियन आणि बंगाली भाषांचा समावेश आहे. एका चाचणीनंतर बंगाली भाषेची भारतीय भाषा म्हणून निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

नक्की वाचा: "मनोज जरांगेंचा निर्णय आमच्यासाठी योग्य", शरद पवारांनी उलगडून सांगितलं

लोकसंख्येची घनता लक्षात घेऊन देशात आशियाई भारतीय भाषांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर बंगाली भाषेवर एकमत झाले. सरकारने त्यानंतर मतदान हक्क कायद्यांतर्गत दक्षिण आशियाई अल्पसंख्याकांना मदत करण्यासाठी बंगाली भाषेचा बॅलेट पेपरमध्ये समावेश करण्यास सांगितले. 2013 मध्ये पहिल्यांदा बंगालीमध्ये अनुवादित बॅलेट पेपर न्यूयॉर्कच्या क्वीन्स परिसरात सापडले होते.

मतपत्रिकेवर बंगाली भाषेचा समावेश करणे ही केवळ शिष्टाचार नसून कायदेशीर गरज असल्याचे मायकेल जे रायन म्हणाले. कायद्यानुसार न्यूयॉर्क शहरातील काही मतदान केंद्रांना बंगालीमध्ये मतदान साहित्य देणे आवश्यक आहे. मतपत्रिकांशिवाय मतदान साहित्यही बंगाली भाषेत आहेत. जेणेकरून बंगाली जाणणाऱ्या आणि बोलणाऱ्या मतदारांना मदत मिळेल. 

Advertisement

( नक्की वाचा : 2 मिनिट उशीर झाला आणि अर्ज कायम राहिला, सोलापूरच्या घटनेची राज्यात चर्चा )

फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश गुप्ता यांनी म्हटलं की, यामुळे भारतीय समुदायाला मदत होईल. बॅलेट पेपरवर बंगाली असल्यामुळे भारतीय लोक बाहेर येऊन मतदान करतील. यातून आपण आवाज उठवू शकतो. 

Topics mentioned in this article