राशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर युक्रेनशी सुरु केलेल्या युद्धला आता तीन वर्ष उलटली आहेत. गेल्या तीन वर्षात रशियानं युक्रेनमध्ये प्रचंड नुकसान घडवून आणल आहे. युद्ध करण्याची पद्धत बदलली आहे. जीवित हानी न करता मालमत्तांची हानी करण्यावर दोन्ही देशांनी भर द्यायला सुरुवात केली आहे. दोन्ही देशातील युद्ध थांबवण्यासाठी सगळ्या जगातून प्रयत्न सुरु आहेत. पण त्यांना यश मात्र येत नाही. त्यामुळे आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सेंकडरी टेरिफची थमकी दिली. त्यांची ही धमकी आता नव्या शितयुद्धाची नांदी तर ठरणार नाही ना अशी भिती निर्माण झाली आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही धमकी ज्यावेळी दिली, त्यावेळी त्यांच्यासोबत नाटोचे महासचिव होते. नाटो युरोप आणि अमेरिका यांना जोडणारा दुवा मानला जातो. शिवाय नाटो स्थापनाच रशियाला विरोधासाठी झाली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या प्रस्तावाला नाटोच्या महासचिवांनी पाठिंबा दिला नसता तरच नवल म्हणावं लागेल.
यावर नाटोचे महासचिव मार्क रुट म्हणाले की राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी काय म्हटलंय ते नीट समजून घ्या. जर रशिया युद्ध थांबवण्यास तयार नसेल, तर ते 50 दिवस थांबतील. जर युद्ध थांबलं नाही, तर भारत, चीन ब्राझिल सारख्या देशांना मोठे आर्थिक परिणाम भोगावे लागतील. म्हणून माझी या देशांना विनंती आहे, विशेषतः जे दिल्लीत राहातात, जे बिजींगमध्ये त्यांना माझं सांगणं आहे, जर तुम्ही यात लक्ष घातलं नाहीतर तुम्हाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. म्हणून दिल्लीतून किंवा बिजींगमधून किंवा ब्राझिलमधून पुतीन यांना फोन करा. सांगा आणि शांती प्रक्रियेत विषयी गांभीर्यानं विचार करा. कारण तुम्ही तसं केलं नाही तर त्याचा फटका आम्हाला बसणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत स्मार्ट खेळी केली आहे असं ते म्हणाले.
तिकडे रशिया सामान्य नागरिकांमध्ये याविषयी तीव्र भावना व्यक्त होत आहेत. ट्रम्प यांच्या धमक्यांना रशियाचे प्रमुख फारसे भाव देणार नाहीत अशी भावना मॉस्कोतले नागरिक व्यक्त करतायत. जर युद्ध थांबलं नाही, तर त्यांची लोकप्रियता कमी होणार आहे. त्यांना शांतीदूत व्हायचं आहे. त्यांना असं वाटतं, की ते शिटी वाजवतील आणि मग सगळे एका रांगेत उभे राहातील. पण तसं होणं अशक्य आहे असं आंद्रे बानक्येव्ह या मॉस्कोच्या नागरिकाचं म्हणणं आहे. आम्ही आमच्या देशाचं नेतृत्व एका विचारी माणसाच्या हाती दिलं आहे. ते आणि त्यांची टीम बघेल नेमकं काय कारायचं असं ही एका नागरिकानं म्हटलं आहे.
नक्की वाचा - मुस्लीम देश, मुस्लिम शहर, मुस्लिम जनता अन् रामायणाचा प्रयोग, देशाचं नाव ऐकून बसेल धक्का
रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांती प्रक्रिया तुर्कीत सुरु झाली. त्यांच्या दोन बैठका झाल्या. पण युद्धकैदी परत देण्यापलिकेडे दोन्ही देशांमध्ये कोणतही एकमत झालं नाही. उलट एकीकडे दोन्ही देशाचे प्रतिनिधी शांतीच्या वाटाघाटी करत असताना दोन्ही देश एकमेकांवर ड्रोननं हल्ले करत होते. रशियानं तर कीव्हवर आतापर्यंतचे सर्वात मोठे हल्ले केले. एकीकडे ट्रम्प युद्ध थांबविण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करत असले, तरी त्याचे उलटेच परिणाम होताना दिसत आहेत. कारण ट्रम्प शांतीसाठी प्रयत्न करताना धमकीची भाषा वापरत आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबले तेव्हा थांबेल. जगात यानिमित्तानं नवं शीत यु्द्ध सुरु होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. नाटो विरुद्ध ब्रिक्स अशी ही लढाई उभी राहण्याची
भीती व्यक्त होतेय असं आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासत अनय जोगळेकर यांनी सांगितलं.