भारताच्या जावईबापूंचे भवितव्य पणाला, इंग्लंडमध्ये मतदानाला सुरुवात

ही निवडणूक 44 वर्षांच्या सुनक यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. हुजूर पक्ष अर्थात कंजर्वेटिव पक्षाचे उमेदवार आणि सध्याचे इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक विरूद्ध मजूर पक्ष अर्थात लेबर पक्षाचे कीर स्टार्मर यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या दोघांसह ब्रिटनच्या लाखो लोकांनी मतदानात भाग घेतला आहे. इंग्लंडच्या यॉर्कशायरमधील रिचमंड आणि नॉर्थलेर्टन मधीत मतदान केंद्रातून सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षरा मूर्ती यांनी मतदान केले. स्टार्मर यांनी त्यांची पत्नी व्हिरक्टोरीया यांनी कॅमेडम येथील मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक 44 वर्षांच्या सुनक यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे.  


सुनक यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान कर वाढवणाऱ्या मजूर पक्षाला सत्तेत येऊ न देण्याचे आव्हान केले. इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स आणि उत्तरी आयरलँडमध्ये एकूण 650 मतदारसंघ  आहेत. या निवडणुकीत हुजूर आणि मजूर पक्षाव्यतिरिक्त लिबरल डेमोक्रॅट्स, ग्रीन पार्टी, स्कॉटिश नेशनल पार्टी (एसएनपी), एसडीएलपी, डेमोक्रॅटिक युनियनिस्ट पार्टी (डीयूपी), सिन फिएन, प्लेड सायमरू, रिफॉर्म पार्टी या पक्षांनीही आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. ब्रिटेनमध्ये जवळपास 40 हजार मतदान केंद्रे उभारण्यात आली आहे. ब्रिटेनमध्ये तिथल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात करण्यात आली. रात्री दहा वाजता मतदान संपेल. ब्रिटनमध्ये 4 कोटी 60 मतदार असून ते ब्रिटेनचा पुढचा पंतप्रधान कोण होणार हे ठरवतील. 

दहा वाजल्यानंतर मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल्स जाहीर केले जातील. ज्यातून अंदाज येऊ शकेल की ब्रिटेनमध्ये आपली सत्ता राखण्यात हुजूर पक्ष यशस्वी होतो का मजूर पक्ष त्यांच्या हातून सत्ता खेचून घेतो. या निवडणुकीकडे भारतीयांचेही लक्ष लागलेले आहे कारण ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे असून त्यांच्या पत्नी अक्षता या इन्फोसिसचे संस्थापक नायारण मूर्ती आणि प्रसिद्ध लेखिका, खासदार सुधा मूर्ती यांच्या कन्या आहेत. 2019 च्या निवडणुकीत हुजूर पक्षाने 365 जागांवर विजय मिळवला होता तर मजूर पक्षाने 202 जागांवर विजय मिळवला होता.