हेलेन चक्रीवादळ अमेरिकेच्या किनारपट्टी भागात धडकलं आहे. यामध्ये आतापर्यंत 4 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. CNN न्यूजनुसार, गुरुवारी हेलेन वादळ फ्लोरिडामध्ये पोहोचलं. यावेळी वाऱ्याचा वेग जवळपास 225 किमी/प्रतितास होता. फ्लोरिडामधील अनेक भागांना या वादळाचा फटका बसला.
फ्लोरिडाच्या आजूबाजूचे राज्य जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, साऊथ कॅरोलिना, वर्जिनिया आणि अलबामा येथे इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. हेलेन वादळामुळे जवळपास 1.20 कोटी नागरिकांना फटका बसला आहे. हेलेन चक्रीवादळ इतर राज्यांमध्ये पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं झाल्यास जवळपास 5 कोटी नागरिकांना याचा फटका बसू शकतो.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हेलेन चक्रीवादळामुळे अमेरिकेतने अनेक भागांमध्ये मुसळदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. फ्लोरिडामध्ये चक्रीवादळामुळे अनेक घरांचंही नुकसान झालं आहे.
(नक्की वाचा- अमित शहांचेही कापले होते तिकीट, त्यावेळचा किस्सा काय? अमित शहांनी स्वत: सांगितलं)
वीज पुरवठा खंडीत
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर फ्लोरिडामधील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ज्यामुळे जवळपास 20 लाख नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सखल भागात राहण्याच्या नागरिकांना उंचीवर पोहोचण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
(नक्की वाचा- सैफ अली खानने केले राहुल गांधींचं भरभरून कौतुक, नेमकं काय म्हणाला?)
विमान वाहतुकीवर परिणाम
चक्रीवादळचा हवाई वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. जवळपास 1000 फ्लाईट्स रद्द करण्यात आली आहे. याशिवाय 4000 हून अधिक विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. हेलेने चक्रीवादळ हे सर्वात शक्तीशाली वादळांपैकी एक मानलं जात आहे. त्यामुळे याला चौथ्या कॅटगरीत ठेवण्यात आलं आहे, जे विनाशकारी मानलं जातं.
चक्रीवादळादरम्यान समुद्रात 6 मीटरपर्यंतच्या लाटा उसळू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. धोका लक्षात घेता फ्लोरिडा किनाऱ्यापासून उत्तर जॉर्जिया आणि पश्चिम कॅरोलिनापर्यंतच्या भागात वादळ आणि पुराचा इशारा देण्यात आला आहे.