विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहात आहे. अनेक जण पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. उमेदवारी मिळाली नाही तर दुसऱ्या पक्षात जाण्याची तयारीही अनेकांनी केली आहे. तर काही जण अपक्ष म्हणूनही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. काही तर उमेदवारी नाही तर पक्षाचे कामही नाही अशा भूमीकेत आहेत. ही स्थिती साधारण पणे सर्वच पक्षात आहे. भाजपमध्येही काही वेगळी स्थिती नाही. याची कल्पना केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनाही आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधीत करताना त्यांनी त्यांच्या बरोबर झालेला किस्सा सांगितला आहे. एकेकाळी पक्षाने आपलेही तिकीट कापले होते, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. शिवाय त्यानंतर काय झाले होते याचा रोचक किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निवडणुकीत सर्वच पक्षात बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तर काय केलं पाहीजे, याचा स्वत:बरोबर झालेला किस्साच अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना सांगितला. माझे तिकीट एकेकाळी कापले गेले होते. आज नाईलाजाने मला काहींची तिकीटं कापावी लागत आहेत असं ते म्हणाले. नागपूरमध्ये ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. शिवाय आमच्यापैकी कोणाचे ही तिकीट कापले गेले तर आम्ही बंड करणार नाही, असेही यावेळी त्यांना कार्यकर्त्यांकडून वदवून घेतले.
ट्रेंडिंग बातमी - 'मी विधानसभेत दिसणार' निलेश राणेंच्या घोषणेनं कोणाचा पत्ता कट होणार?
यावेळी त्यांची आमदारकीची उमेदवारी पक्षाने पक्षाने कापल्यानंतर काय झालं होतं याचा किस्साही कार्यकर्त्यांना सांगितला. शिवाय तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरेंची उदाहरण ही दिले. अमित शाह वयाच्या पस्तीशीत असताना पक्षाने त्यांचे आमदारकीचे तिकीट कापले होते. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या कुशाभाऊ ठाकरे त्यांच्या घरी ते गेले. अमित शाह त्यांना म्हणाले, ‘माझे तिकीट कापले, मी दुःखी आहे.' कुशाभाऊ म्हणाले, ‘तू प्रचार करू नको. कारण दुःखी मनाने कुणी काम करू शकत नाही. पण तुझ्याकडे कुणी येणार नाही हेही बघ. कारण ज्याला घरी जाऊन समजवावे लागते, तो कार्यकर्ताच नाही असे मी मानतो अशा शब्दात कुशाभाऊंनी अमित शहा यांना सुनावले होते. हा किस्सा यावेळी त्यांनी आवर्जून सांगितला.
ट्रेंडिंग बातमी - बांगलादेशी पॉर्नस्टारला उल्हासनगरमधून अटक, तपासात धक्कादायक माहिती आली समोर
यातून त्यांनी कार्यकर्त्यांना एक प्रकारे समजही दिली. तुम्ही जरी नाराज झालात तरी तुमची मनधरणी करायला कोणी घरी येणार नाही हेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकले. विधानसभा निवडणूक लढवण्यास भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय अनेक विद्यमान आमदारांची तिकीटेही कापली जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी बंडखोरी रोखण्याचे मोठे काम भाजपच्या पक्षश्रेष्ठीं समोर आहे. हरियाणामध्ये ही उमेदवारी कापल्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. महाराष्ट्रात तसे होवू नये यासाठी पक्ष प्रयत्नशिल आहे. त्यामुळे अमित शहा यांनी त्यांच्या बरोबर झालेला किस्सा कार्यकर्त्यांना सांगितला. पण त्याचा कितपत असर इच्छुकांवर होतो हे पहावे लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world