ChatGPT Helps Women Won Lottery: आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) केलेल्या चमत्कारांच्या बातम्या (News) नेहमीच प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असतात. अशीच एक धक्कादायक आणि आनंदाची बातमी अमेरिकेतून (America) आली आहे, जिथे चॅटजीपीटीने (ChatGPT) एका महिलेला तब्बल ८८ लाख रुपयांची लॉटरी (Lottery) जिंकून दिली. या महिलेने एआय प्रोग्राम चॅटजीपीटीने सुचवलेल्या नंबरवर लॉटरी खेळली आणि तिला १,००,००० डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे ८८ लाख रुपयांची मोठी रक्कम मिळाली आहे.
४५ वर्षीय टॅमी कार्वे (Tammy Karwe) नावाच्या या महिलेने मिशिगन लॉटरी अधिकाऱ्यांना सांगितले की, त्यांनी सप्टेंबरमध्ये पॉवरबॉल (Powerball) लॉटरीचे तिकीट ऑनलाईन खरेदी केले होते, जेव्हा जॅकपॉट १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त पोहोचला होता. टॅमी यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना सांगितले की, "जॅकपॉट खूप मोठा असेल तेव्हाच मी पॉवरबॉल खेळते. यावेळी जॅकपॉट १ अब्ज डॉलरच्या वर होता, म्हणून मी तिकीट खरेदी केले. पण, यावेळी मी चॅटजीपीटीला पॉवरबॉलसाठी काही नंबर विचारले आणि तेच नंबर मी माझ्या तिकीटावर खेळले."
६ सप्टेंबर रोजी झालेल्या ड्रॉमध्ये टॅमीचे तिकीट ४ पांढऱ्या बॉल (White Balls) आणि पॉवरबॉलशी जुळले. ज्यामुळे त्यांना सुरुवातीला ५०,००० म्हणजेच सुमारे ४४ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. मात्र, त्यांचा आनंद तेव्हा द्विगुणित झाला जेव्हा पॉवर प्ले (Power Play) पर्यायामुळे त्यांची जिंकलेली रक्कम १,००,००० (सुमारे ८८ लाख रुपये) झाली.
टॅमी यांनी हसतमुखाने सांगितले, "मी जिंकलेले नंबर तपासले तेव्हा मला कळले की माझे ४ पांढऱ्या बॉल आणि पॉवरबॉलचे नंबर मॅच झाले आहेत. मला वाटले की मी काहीतरी जिंकले आहे. जेव्हा मी गूगलवर पाहिले, तेव्हा ते ५०,००० चे बक्षीस असल्याचे कळले. पण जेव्हा मी माझ्या मिशिगन लॉटरी खात्यात लॉग इन केले, तेव्हा लक्षात आले की मी 'पॉवर प्ले' पर्याय घेतला होता, ज्यामुळे माझी जिंकलेली रक्कम १,००,००० झाली! मी आणि माझ्या पतीने यावर विश्वास ठेवला नाही, आम्ही पूर्णपणे आश्चर्यचकित झालो".
टॅमी यांनी ही मोठी रक्कम त्यांच्या आयुष्यासाठी एक 'मोठी भेट' असल्याचे म्हटले आहे. या रकमेतून त्या आपल्या घराचे कर्ज (Home Loan) फेडणार आहेत आणि आपली बचत (Savings) आणखी वाढवणार आहेत. एआयच्या मदतीने लॉटरी जिंकल्याची ही घटना जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुण्याच्या मॉर्डन कॉलेजमुळे मराठी तरुणानं लंडनमधील नोकरी गमावली? प्राचार्यांनी दिलं उत्तर )