चीनच्या AI स्टार्टअप DeepSeek ने लॉन्च होताच जगभरात खळबळ उडवून दिली आहे. DeepSeek ने वेस्टर्न चॅटबॉट्सच्या तुलनेत कमी किमतीत तशीच कामगिरीचे मॉडेल सादर केले आहे. ज्यामुळे जगभरातील टेक कंपन्यांनी झोप उडाली आहे. अमेरिकेतील टेक कंपन्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमेरिकन टेक कंपन्यांच्या शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारी अमेरिकन शेअर बाजार उघडताच Nvidia Corp चे शेअर्स जोरदार आपटले. जगातील सर्वात मोठी टेक कंपनी Nvidia Corp च्या बाजार मूल्यातील ही सर्वात मोठी ऐतिहासिक घसरण होती. ज्यामुळे जगभरातील टेक कंपन्यांमध्ये घबराट पसरली आहे.
(नक्की वाचा- Modi-Trump Phone Call : PM नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा प्लॅन ठरला, ट्रम्प यांनी सांगून टाकला)
सोमवारी अमेरिकन टेक कंपन्यांचा निर्देशांक नॅसडॅक तीन टक्के घसरला. यात प्रामुख्याने मेटा, गुगल (अल्फाबेट), अॅपल, Nvidia, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना सर्वात मोठा झटका बसला आहे. NVIDIA चा शेअर तब्बल 11 टक्के घसरला. Nvidia चे मालक जेनसन हूऑंग यांचं एकट्याचे 20 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. जगातील बड्या अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीतून साधारण 108 अब्ज डॉलर्सचा चुराडा झाल्याचं ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.
DeepSeek काय आहे?
DeepSeek हे चीनचे अॅडव्हान्स AI मॉडेल आहे. चीनची सिलिकॉन व्हॅली म्हटल्या जाणाऱ्या हँगझोऊ येथील डीपसीक नावाच्या संशोधन प्रयोगशाळेने ते विकसित केले आहे. त्याची स्थापना 2023 मध्ये लिआंग वेनफेंग या चीनी AI इंजिनिअरने केली होती. एआयच्या जगात चीनची कंपनी डीपसीक सातत्याने नवे धक्के देत आहे. चॅट जीपीटी सारख्या नव्या मात्र स्वस्त एआय मॉडेलच्या माध्यमातून त्यांनी नवीन धमाका केला आहे.
(नक्की वाचा- Viral Post : Zepto कडून iphone युजर्सवर अन्याय? Android च्या तुलनेने वस्तू महाग विकल्या जात असल्याच आरोप)
DeepSeek चा AI असिस्टंट ChatGPT ला मागे टाकत अमेरिकेच्या Apple App Store वर पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. DeepSeek च्या येण्याने, Nvidia सारख्या मोठ्या टेक कंपन्यांसाठी ते नवीन आणि स्वस्त AI मॉडेल्सशी कसे स्पर्धा करतील हे जाणून घेणे आता एक आव्हान आहे.