Iran-US War: पायलटला वाचवण्यासाठी महाभारतातील रणनीती आली कामी; शत्रूच्या घरात घुसून अमेरिकेचा 'माईंड गेम'

Iran-US War: इराणच्या लष्कराला एका खोट्या अफवेच्या जाळ्यात अडकवून, डोळ्यांदेखत अमेरिकन वैमानिकाची सुटका करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Iran-US War: युद्धभूमीवर कधीकधी एक 'अफवा' जास्त प्रभावी ठरते, याचा प्रत्यय अमेरिकेला आला आहे. इराणमध्ये कोसळलेल्या अमेरिकन विमानातील वैमानिकाला (Pilot) वाचवण्यासाठी CIA ने अशी काही चाल खेळली की, इराणचे लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा चक्रावून गेल्या.

'नरो वा कुंजरो वा' ही महाभारतातील एक प्रसिद्ध उक्ती आहे. यात महाभारतात ज्याप्रमाणे द्रोणाचार्यांना विचलित करण्यासाठी 'अश्वत्थामा' मेल्याची अफवा पसरवली होती, अगदी तसाच फॉर्म्युला वापरून अमेरिकेने हे कठीण ऑपरेशन यशस्वी केले.

अफवेने इराणचे लक्ष विचलित

जेव्हा इराणी सैन्य चोहोबाजूला अमेरिकन वैमानिकाचा शोध घेत होते, तेव्हा CIA ने जाणीवपूर्वक एक अफवा पसरवली. "अमेरिकन सैन्याने आपल्या पायलटला आधीच शोधले असून, त्याला रस्ते मार्गाने गुपचूप देशाबाहेर नेले जात आहे." ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच इराणच्या सुरक्षा दलांचे लक्ष विचलित झाले. त्यांनी जंगले आणि डोंगराळ भागातील शोध थांबवून सर्व महामार्ग आणि सीमांवर नाकेबंदी करण्यास सुरुवात केली.

Advertisement

(नक्की वाचा-  Kalyan-Dombivli Schools: कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण)

CIA चे 'ऑपरेशन सायलेंट'

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "इराणी सैनिक अशा ठिकाणी पहारा देत होते जिथे पायलट नव्हताच."  इराणचे सैन्य रस्ते तपासण्यात दंग असताना, CIA च्या तज्ज्ञांनी शांतपणे पायलटचे अचूक लोकेशन ट्रेस केले. पायलटची माहिती मिळताच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विनाविलंब 'एक्सट्रॅक्शन' करण्याचे आदेश दिले.

'सायकोलॉजिकल वॉरफेयर'चे यश

व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांच्या मते, हे अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक मिशन होते. शत्रूच्या घरात शिरून त्यालाच विचलित करणे सोपे नव्हते. जोपर्यंत इराणला आपली चूक उमजली आणि त्यांना समजले की आपल्याला चुकीची माहिती दिली गेली आहे, तोपर्यंत अमेरिकन कमांडोंनी आपले काम फत्ते केले होते आणि वैमानिकाला घेऊन ते सुरक्षित स्थळी पोहोचले होते.

(नक्की वाचा-  Pimpri-Chinchwad: सावधान! वाकडमध्ये प्रवास करताना होऊ शकते फसवणूक; पाहा VIDEO, नेमकं काय होतंय?)

आधुनिक युद्धातील नवी रणनीती

हे ऑपरेशन केवळ शौर्याचे उदाहरण नसून, सायकोलॉजिकल वॉरफेअरचं उत्तम उदाहरण मानले जात आहे. तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा वापर शस्त्र म्हणून कसा केला जाऊ शकतो, हे अमेरिकेने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे.

Topics mentioned in this article