जाहिरात

Coldplay kiss cam : एका व्हिडिओने अख्खं आयुष्यं उद्ध्वस्त; ॲस्ट्रॉनॉमर चे CEO अँडी बायरन यांचा पदावरुन राजीनामा 

एका कॅमेऱ्यात त्यांच्यातील रोमँटिक क्षण कैद झाला. यानंतर दोघांच्याही आयुष्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Coldplay kiss cam : एका व्हिडिओने अख्खं आयुष्यं उद्ध्वस्त; ॲस्ट्रॉनॉमर चे CEO अँडी बायरन यांचा पदावरुन राजीनामा 

Coldplay Kiss Cam Viral Video: कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये ॲस्ट्रॉनॉमर कंपनीचे सीईओ अँडी बायरन यांचा एचआर हेड सोबत व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका कॅमेऱ्यात त्यांच्यातील रोमँटिक क्षण कैद झाला. यानंतर दोघांच्याही आयुष्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही बाब केवळ त्यांच्या देशातच नाही तर जगभराच चर्चेचा विषय ठरला आहे. कंपनीच्या सीईओचे विवाह्यबाह्य संबंध समोर आल्यानंतर दोघांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. 

अमेरिकेतील टेक कंपनी ॲस्ट्रॉनॉमरचे सीईओ अँडी बायरन यांनी शनिवारी आपल्या पदावरुन राजीनामा दिला आहे. न्यूयॉर्क स्थित कंपनी ॲस्ट्रॉनॉमरने लिंक्डइनवर शेअर केलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे, कंपनीच्या नेतृत्वाकडून चांगले वर्तन आणि जबाबदारीची अपेक्षा असते. मात्र अलीकडे याला धक्का बसला आहे. अँडी बायरन यांनी राजीनामा दिला आहे. याशिवाय कंपनीकडे या प्रकरणाची प्राथमिक चौकशीही सुरू केली आहे. 

Hot Story of Cold Play: एका कॅमेरानं केला घात, जगासमोर आली लफड्याची बात,सोशल मीडिया सैराट

नक्की वाचा - Hot Story of Cold Play: एका कॅमेरानं केला घात, जगासमोर आली लफड्याची बात,सोशल मीडिया सैराट

अँडी बायनरसोबत रोमान्स करणाऱ्या एचआर हेड कोण आहेत?

क्रिस्टिन कॅबोट कोण आहेत?

क्रिस्टिन कॅबोट या ॲस्ट्रॉनॉमर (Astronomer) या टेक कंपनीच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी (Chief Public Officer) आहेत. त्यांचा जन्म अमेरिकेतील बोस्टनमध्ये झाला. त्यांनी गेटिसबर्ग कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी घेतली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये त्या ॲस्ट्रॉनॉमर कंपनीत दाखल झाल्या. 

कॅबोट यांनी 2000 मध्ये त्यांनी 'द स्क्रीन हाऊस'मध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. अनेक संस्थांमध्ये काही काळ काम केल्यानंतर, 2004 मध्ये त्या 'डिजिटासएलबी' (DigitasLBi) मध्ये रुजू झाल्या. तिथं त्यांनी असोसिएट डायरेक्टर आणि यूएस टॅलेंट ऑपरेशन्स आणि रिक्रूटिंगच्या प्रमुख म्हणून काम केले. त्यानंतर, ॲस्ट्रॉनॉमरमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी अनेक संस्थांमध्ये ग्लोबल टॅलेंट मॅनेजमेंट (Global Talent Management) प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

कॅबोट स्वतःचं एक उत्तम नेत्या (passionate people leader) म्हणून वर्णन करतात. वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअप्स आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी सुरुवातीपासूनच विनिंग कल्चर  निर्माण करण्यासाठी त्या ओळखल्या जातात, असे त्यांच्या लिंक्डइन बायोमध्ये म्हटले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com