Divya Deshmukh Chess : नागपुरच्या दिव्या देशमुखची मोठी कामगिरी; जगातील पहिल्या क्रमांकाच्या महिला बुद्धिबळपटूवर दणदणीत विजय!

नागपूरच्या दिव्या देशमुखने जागतिक बुद्धिबळात मोठी कामगिरी केली आहे. लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड टीम ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत दिव्याने जगातील पहिल्या क्रमांकावरील महिला बुद्धिबळपटू हाऊ यिफान हिला पराभूत करत इतिहास रचला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chess Championship : नागपूरच्या दिव्या देशमुखने जागतिक बुद्धिबळात मोठी कामगिरी केली आहे. लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड टीम ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत दिव्याने जगातील पहिल्या क्रमांकावरील महिला बुद्धिबळपटू हाऊ यिफान हिला पराभूत करत इतिहास रचला आहे. उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यात दिव्याने हा सामना जिंकला. तब्बल 74 चालींच्या या लढतीत यिफान हिने अखेरच्या टप्प्यात एक चूक केली आणि दिव्याने ती संधी साधत सामना आपल्या नावावर केला. तिचा हा विजय तिच्या संयम, कौशल्य आणि आत्मविश्वासाचं प्रतीक ठरला.

दिव्या देशमुख (Who is divya Deshmukh) HexaMind Chess Club या संघाकडून खेळत होती. ब्लिट्झ फॉर्मेटमध्ये तिने ८ पैकी ६ सामने जिंकले. एक बरोबरीत ठेवला आणि एक गमावला. तिचं प्रदर्शन २६०६ रेटिंगपर्यंत पोहोचलं. तिच्या या कामगिरीमुळे संघाने उझबेकिस्तानवर ३.५ – २.५ अशी मात करत कांस्य पदक जिंकलं. रॅपिड विभागात संघाला रौप्यपदक, आणि दिव्याला वैयक्तिक कांस्यपदक देखील मिळालं.

Advertisement

नक्की वाचा - Vande Bharat Express : नागपूर ते पुणे आणि मुंबई मार्गावरही धावणार वंदे भारत एक्स्प्रेस, कधीपासून होणार सुरू?

दिव्याच्या या विजयाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. ‘एक्स'वरून त्यांनी दिव्याचं अभिनंदन केलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय, दिव्याचा विजय तिच्या चिकाटी आणि निर्धाराचं उदाहरण आहे. तिची कामगिरी अनेक तरुण बुद्धिबळपटूंना प्रेरणा देईल. हा विजय केवळ दिव्याचाच नव्हे, तर भारताच्या बुद्धिबळ सामर्थ्याचं जागतिक स्तरावर गाजलेलं उदाहरण ठरलं आहे.


 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world