Donald Trump: अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये ट्रम्प यांचं अपिल फेटाळण्यात आलं आहे. त्यांच्यावर पाच दशलक्ष अमेरिकन डॉलर दंड आकारला आहे. अमेरिकीतील एका कोर्टानं हा निर्णय जाहीर केला आहे. या कोर्टानं ट्रम्प यांची या विषयावरील याचिका फेटाळली आहे. त्याचबरोबर कोर्टानं या प्रकरणात ट्रम्प यांना दोषमुक्त करण्यासही नकार दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
एडल्ट फिल्म स्टार स्टॉर्मी डेनियल्सशी संबंधित प्रकरणातील खटल्यावर निर्णय देताना अमेरिकेतील एका न्यायालयानं ट्रम्प यांना दोषी ठरवलं होतं. ट्रम्प नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला. आता 20 जानेवारी 2025 रोजी ते अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संघीय न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिलं होतं.
( नक्की वाचा : अमेरिकन नागरिकत्वाचा शॉर्टकट बंद होणार? संपूर्ण जगाचं ट्रम्पकडे लक्ष )
या प्रकरणात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार संघीय न्यायालयानं अमेरिकेच्या नव निर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर न्यूयॉर्कच्या ज्यूरीनं ठोठावलेला 5 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा दंड आणि शिक्षेचा निष्कर्ष योग्य ठरवला आहे.