ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी, तर फॉक्स न्यूजचे अँकर बनणार संरक्षणमंत्री?

20 जानेवारी 2025 पासून अमेरिकेत ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाची दुसरी इनिंग सुरू होणार आहे. अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या भाषणात इलॉन मस्क आणि त्यांच्या कंपनीचे कौतुकही केले होते. 

जाहिरात
Read Time: 2 mins
डोनाल्ड ट्रंप ने अपनी नई टीम का किया ऐलान

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराच्या काळात टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क नेहमी त्यांच्यासोबत दिसले. आता निवडणुका संपल्यानंतर एलॉन मस्क यांना याचं बक्षिस मिळालं आहे. 20 जानेवारी 2025 पासून अमेरिकेत ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाची दुसरी इनिंग सुरू होणार आहे. अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या भाषणात इलॉन मस्क आणि त्यांच्या कंपनीचे कौतुकही केले होते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी?

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नवीन सरकारमध्ये इलॉन मस्क यांना मोठी जबाबदारी मिळू शकते. ट्रम्प यांनी एलॉन मस्क आणि उद्योजक विवेक रामास्वामी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ते सरकारी कार्यक्षमता विभागाचे (DOGE) नेतृत्व करतील. ट्रम्प यांनी याबाबत एक निवेदनही जारी केलं आहे. रामास्वामी यांनी निवडणुकीत ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. रामास्वामी हे गेल्या वर्षी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या शर्यतीत होते. मात्र, नंतर त्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. 

(नक्की वाचा-  रशिया-युक्रेन युद्ध संपणार? ट्रम्प यांचं राष्ट्राध्यक्ष बनताचा मोठं पाऊल )

फॉक्स न्यूजचे अँकर बनणार संरक्षणमंत्री?

फॉक्स न्यूजचे अँकर पीट हेगसेथ यांचाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. ट्रम्प पीट हेगसेथ यांना संरक्षण मंत्री बनवणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच ट्रम्प यांनी स्टीव्हन विटकॉफ यांची मध्यपूर्वेतील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना इराक आणि अफगाणिस्तान युद्धांचाही अनुभव आहे. 

एलिस स्टेफानिक यांची संयुक्त राष्ट्रांच्या राजदूतपदी नियुक्ती

सीएनएनच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी त्यांचे सहाय्यक एलिस स्टेफानिक यांना संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे राजदूत म्हणून पाठवण्याची ऑफर दिली आहे. स्टेफनिक यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Advertisement

(नक्की वाचा-  शेख हसीनांच्या मुद्द्यावर बांगलादेश भारताला रेड नोटीस धाडणार?)

टॉम होमन 

ट्रम्प यांनी टॉम होमन यांना अमेरिकेच्या सीमा आणि बेकायदेशीर स्थलांतरितांच्या हद्दपारीचे प्रभारी बनवले आहे. होमन यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळात स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणीचे माजी कार्यकारी संचालक म्हणून काम केले होते.

Topics mentioned in this article