अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केले आहेत. रशियाकडून स्वस्त कच्चं तेल विकत घेऊन भारत ते खुल्या बाजारात चढ्या दरानं विकतो. त्यातून मोठा नफा कमावतो असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. त्यामुळे आता भारतावर आणखी टेरिफ लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसात ट्रम्प हे भारता विरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यातून ते टेरिफ लावण्याची धमकी देत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी 25 टक्के टेरीफची घोषणा केली होती.
रशियाशी भारताचे घनिष्ठ व्यापारी संबंध आहेत. रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरु झाल्यानंतर भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो. याच आयातीवर बोट ठेवून ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टेरीफ लादण्याचा निर्णय घेतला. आज पुन्हा एकदा तीच री ओढत ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशलवर भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. तर ट्रम्प यांनी भारतीय अर्थ व्यवस्था ही मृत आहे. असं वक्तव्यही केले होते. त्याचे पडसाद भारतात उमटले होते.
ट्रम्प यांनी यावेळी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. ते म्हणतात भारतावर आम्ही आणखी टॅरिफ लावणार आहोत.
सोशल मीडियावरून ट्रम्प यांनी ही माहिती दिली. भारत तेल्याच्या विक्रीतून नफा कमावतो असा आरोप ट्रम्प यांचा आहे. शिवाय युद्धात लोक मरतायत त्याची भारताला फिकीर नाही अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या या प्रतिक्रीयेला भारतातून काय प्रत्युत्तर येतं हे पहावं लागेल.