अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी अनेक देशांवर नवीन जशास तसे आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या नव्या शुल्काचा परिणाम अमेरिकेच्या भारतासारख्या मित्र देशांपासून ते चीनसारख्या शत्रू देशांपर्यंत सर्वांवरच होणार आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 34 टक्के आणि युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 20 टक्के नवीन शुल्क लादले आहे. त्यांनी भारतावर 26 टक्के आयातशुल्क लादले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा )
(नक्कीचा- यूएस टॅरिफ : सरकारच्या रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाची भारत देशाला धास्ती, काय परिणाम होणार? )
जगभरातील देश अमेरिकेवर जेवढे शुल्क लादतात त्याच्या निम्मेच शुल्क आम्ही लादत आहोत. त्यामुळे हे शुल्क जशास तसे नाही आहेत. भारताकडून लादल्या जाणाऱ्या आयात शुल्काला त्यांनी 'खूप कठोर' म्हटलं आहे.
"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अलिकडेच अमेरिकेत आले होते. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. मी त्यांना सांगितले की तुम्ही माझे मित्र आहात पण तुम्ही आमच्याशी योग्य वागत नाही आहात. भारत आमच्याकडून 52 टक्के शुल्क आकारतो, म्हणून आम्ही त्यांच्याकडून निम्मे 26 टक्के शुल्क आकारणार आहोत", असंही ट्रम्प यांनी म्हटलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांना सल्ला दिला की, 'जर तुम्हाला आयात शुल्क कमी करायचे असेल तर प्रथम तुमचे आयात शुल्क कमी करा.' जर तुम्ही अमेरिकेत तुमचा उद्योग उभारला आणि उत्पादने तयार केली तर कोणताही शुल्क आकारला जाणार नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं.