अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गुलछबू आणि सौंदर्यवतींवर लगेच लट्टू होणारे म्हणून प्रसिद्धीस पावलेले आहेत. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी ट्रम्प यांनी केलेल्या करामती आजही अमेरिकेमध्ये चर्चेचा विषय असतात. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल एक विधान केले आहे. या विधानामुळे हलकल्लोळ माजला आहे. लेविट यांचे ट्रम्प यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. कौतुक करताना ट्रम्प यांनी वापरलेले शब्द हा सध्या वादाचा मुद्दा बनला आहे.
( नक्की वाचा: वय अवघं 12 , लहान वयात सत्ता सांभाळणार, अणू बॉम्बचे रिमोटही हाती येणार, कोण आहे किम जू ऐ? )
ट्रम्प काय म्हणाले?
ट्रंप यांनी न्यूजमॅक्सला (Newsmax) दिलेल्या मुलाखतीत कॅरोलिन लेविट (Carolyn Leavitt) यांना “आतापर्यंतच्या सर्वोत्तम माध्यम सचिव” म्हटले आहे. त्यांनी लेविट यांचे कौतुक करताना, “ती एक स्टार बनली आहे. तिचा चेहरा आणि तिचे ओठ ज्या पद्धतीने हलतात जणू मशीनगनच असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अनेकांनी ट्रम्प यांच्या या शब्दांवर आक्षेप नोंदवला आहे. कॅरोलिन लेविट ही अवघ्या 27 वर्षांची असून ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची निवड माध्य सचिव म्हणून करण्यात आली आहे.
लेविटने केली ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक देण्याची मागणी
नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये लेविटने ट्रम्प यांचे तोंडभरून कौतुक केले. जागतिक पातळीवर ट्रम्प हे शांतता प्रस्थापित करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना नोबेर पारितोषिक द्यायला हवे अशी मागणी त्यांनी केली आहे. लेविट यांनी दावा केला आहे की गेल्या 6 महिन्यांवर नजर टाकल्यास दर महिन्यात ट्रम्प यांनी किमान एक शांतता करार किंवा युद्धविराम घडवून आणला आहे.
( नक्की वाचा: PM मोदींच्या private Secretary निधी तिवारींना सॅलरीसह काय काय मिळतं? सुविधा पाहून हैराण व्हाल! )
सोशल मीडियावर टीका
ट्रम्प आणि लेविट एकमेकांची तोंडभरून तारीफ करत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र या दोघांमुळे रणकंदन माजले आहे. अनेकांनी ट्रम्प यांचे हे विधान हे वाईट असल्याचे म्हटले आहे. काहींनी हे विधान म्हणजे विकृत तर काहींनी आक्षेपार्ह म्हटले आहे. एका व्यक्तीने सोशल मीडियाचा आधार घेत म्हटले आहे की, “जर एखाद्या पुरुषाने त्याच्या कार्यालयातील महिलेबद्दल असे उद्गार काढले तर त्याला तत्काळ नोकरीवरून काढले जाते आणि कंपनीविरोधात खटला दाखल केला जातो.