
PM Modi private Secretary: पंतप्रधान कार्यालय (PMO) देशातील सर्वात महत्त्वाच्या संस्थांपैकी एक आहे. येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. यामध्ये पंतप्रधानांचे खासगी सचिव (Personal Secretary- PS) यांचीही महत्त्वाची भूमिका असते. सध्या पीएम मोदींची Personal Secretary निधी तिवारी आहेत. त्या एक वरिष्ठ अधिकारी आहेत. सोशल मीडियावर निधी तिवारी या नेहमी चर्चेत असतात. त्यांना मिळणाऱ्या सुविधा, पगार याविषयी नेहमी विविध प्रश्न उपस्थित केले जातात.
निधी तिवारी कोण आहे?
निधी तिवारी या २००१ च्या उत्तर प्रदेश केडरच्या बॅचमधील एक वरिष्ठ आयएएस अधिकारी आहे. हे पद फक्त उच्चस्तरीय अधिकारी आणि प्रशासकीय कौशल्ये, धोरण ठरवण्याची समज आणि सरकारच्या कामकाजाची सखोल समज असलेल्यांसाठी आहे. पंतप्रधान कार्यालयातील खाजगी सचिव हे पद ग्रुप-ए सेवांमध्ये येते, जे सहसा आयएएस किंवा समकक्ष सेवांमधील अधिकाऱ्यांकडे असते.
पीएम मोदींच्या खासगी सेक्रेटरीची (Personal Secretary) सॅलरी
नक्की वाचा - PM Modi: 'आता आम्ही फक्त स्वदेशी वस्तूच विकू', ट्रम्प यांच्या टॅरिफ स्ट्राईकनंतर PM मोदींचे चोख उत्तर
सातव्या वेतन आयोगानुसार, त्यांचा बेसिक पेमेंट 1,44,200 प्रति महिना असतो. त्यांची सॅलरी केंद्र सरकराचे सेवा नियम आणि सातवे वेतन आयोगाअंतर्गत निश्चित केली जाते. याशिवाय त्यांनी सरकारी घर, वाहन आणि सुरक्षासारख्या सुविधा मिळतात. ज्यामध्ये अनेक भत्तांचा समावेश आहे.
1. महागाई भत्ता (DA): महागाईनुसार समायोजित
2. घरभाडं भत्ता (HRA): दिल्लीत राहण्यासाठी
3. प्रवास भत्ता: सरकारी प्रवासासाठी
4. वैद्यकीय भत्ता: वैद्यकीय खर्चांसाठी
5. अन्य भत्ते: कार्यालय खर्च, संचार भत्ता आदी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world