Trending News: दुबईसाठी भन्नाट ऑफर! एक अट पाळा अन् बंपर डिस्काऊंट मिळवा, वाच काय आहे खास योजना

नागरिक या योजनेद्वारे शहराचे 'ब्रँड ॲम्बेसेडर' बनू शकतात.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • दुबई प्रशासनाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना सुरू केली आहे ज्यात ८०,००० रुपयांपर्यंत सवलत दिली जाते
  • ए दुबई इन्व्हाईट या योजनेत दुबईत राहणारे रहिवासी आपल्या नातेवाईकांना पर्यटनासाठी आमंत्रित करू शकतात
  • तणावपूर्ण राजकीय परिस्थिती आणि उष्णतेमुळे दुबईच्या पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

परदेशवारी करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण अशा वेळी अडचण असते ती पैशांची. सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळे अनेक जण ही हौस भागवण्यासाठी नेपाळ किंवा श्रीलंकेला जातात. पण आता दुबई ही तुमच्या आमच्या आवाक्यात येणार आहे. त्यासाठी खास आणि भन्नाट ऑफर समोर आली आहे. मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर दुबईतील पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. हा फटका भरून काढण्यासाठी दुबई प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 

दुबईत राहणाऱ्या रहिवाशांनी आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना पर्यटनासाठी आमंत्रित केल्यास, त्यांना 3,000 दिरहाम म्हणजेच 80,000 रुपये मूल्याचे फायदे आणि सवलती देण्याची घोषणा केली आहे. 'दुबई डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमी अँड टुरिझम'ने ही घोषणा केली आहे. एएफपी (AFP) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दुबई मीडिया ऑफिसने बुधवारी, 22 जुलै रोजी एक्स (X) प्लॅटफॉर्मवर ही माहिती प्रसिद्ध केली. 'ए दुबई इन्व्हाईट' (A Dubai Invite) असे या योजनेचे नाव आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही ऑफर लागू राहील. 

Advertisement

नक्की वाचा - Neet Protest: पोलीस फरफटत होते, त्याच वेळी राहुल गांधीच्या कानात पोलीस काय म्हणाले? सर्वात मोठा गौप्यस्फोट

या योजनेअंतर्गत रहिवासी आपल्या पाहुण्यांची नोंदणी सरकारी संकेतस्थळावर करू शकतात. ​गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमधील तणावाचा फटका दुबईच्या पर्यटनावर बसला आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे आखाती देशांमधील पर्यटन सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले होते. यामुळे हिवाळ्याच्या ऐन हंगामात अनेक पर्यटकांनी काढता पाय घेतला होता. या पार्श्वभूमीवर, 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणारे तापमान आणि घटती पर्यटक संख्या सावरण्यासाठी दुबई प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. दुबईत जगभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. दरवर्षी सुमारे 1 कोटी 95 लाख पर्यटक दुबईला भेट देतात.

नक्की वाचा - Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 3 मागण्या! सरकारचं टेन्शन वाढलं, कोंडी फुटणार की प्रकरण चिघळणार?

तुम्ही दुबईत राहताय आणि तुमच्या जवळच्या लोकांना तिथे फिरवायला आणायचा विचार करताय? तर मग तुमच्यासाठी एक भन्नाट आणि मोठी खूशखबर आहे. दुबई सरकारने एक विशेष योजना सुरू केली आहे. आपल्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना दुबईत फिरायला बोलावल्यास तब्बल 80 हजार रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे डिस्काउंट दिले जात आहे. या विशेष ऑफरमध्ये हॉटेलमधील मुक्काम, रेस्टॉरंटमध्ये खमंग जेवणाचे ऑफर्स, प्रसिद्ध ठिकाणांची तिकिटे आणि इतर अनेक सुविधांवर भरघोस सूट मिळणार आहे. ही ऑफर 20 जुलै ते 31 ऑक्टोबर या कालावधीत लागू असेल. दुबईच्या मीडिया ऑफिसने ही माहिती दिली आहे. नागरिक या योजनेद्वारे शहराचे 'ब्रँड ॲम्बेसेडर' बनू शकतात.