ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क हे 12 व्यांदा बाप झाले आहेत. विशेष बाब ही आहे की त्यांच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने त्यांच्या बाळाला जन्म दिला आहे शिवोन जिलिस(Shivon Zilis) असं या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून ती मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीमधील कर्मचारी आहे. मस्क आणि जिलिस यांनी यापूर्वी जुळ्यांना जन्म दिला होता. 2021 साली शिवोनने जुळ्यांना जन्म दिला होता, त्यानंतर 2024 साली तिने आणखी एका मुलाला जन्म दिला आहे. मस्क यांनी त्यांच्या बाराव्या अपत्याबद्दल सार्वजनिकरित्या काहीही सांगितलेले नाही. 27 एप्रिल 2024 रोजी शिवोनने X वर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात ती मुलीसोबत खेळताना दिसते आहे.
When you're Azure, everything is a climbing wall… pic.twitter.com/poiycA7wO7
— Shivon Zilis (@shivon) April 26, 2024
12 मुलांची आई कोण आहे?
इलॉन मस्क यांची एकूण 12 मुले असल्याचे सांगितले जाते. यातील 5 मुले ही मस्क यांची पहिली पत्नी आणि लेखिका जस्टीन मस्कने जन्माला घातली आहेत. तीन मुले ही संगीतकार गिम्सने जन्माला घातली आहेत तर तीन मुले ही शिवोनने जन्माला घातली आहेत. मस्क यांनी एकदा विधान केले होते की हे जग कमी लोकसंख्येच्या समस्येचा सामना करत असून या जगाला उच्च बुद्धीमत्तेच्या अधिकाधिक लोकांची गरज आहे आणि त्यासाठी उच्च बुद्धीमत्तेच्या व्यक्तिंनी अधिकाधिक मुले जन्माला घालणे गरजेचे आहे. शिवोनने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मस्क यांनी तिला अधिकाधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. त्यांनी स्पर्म डोनेट करण्यास आपण तयार असल्याचे सांगितले होते. वॉल्टर इसाकसन यांनी मस्क यांच्या जीवनावर आधारीत पुस्तक लिहिले आहे यामध्ये शिवोनने म्हटले आहे की, माझ्या मुलामध्ये कोणते गुण असावेत त्याबाबत मी साधारणपणे विचार करत नाही. शिवोन ही मस्क यांच्या मुलांसोबतचे फोटो सातत्याने X वर शेअर करत असते.
Hard to hear, but:
— Shivon Zilis (@shivon) May 28, 2024
“What does that say?”
“What does that say… Tesla!”
“That's right” pic.twitter.com/Z8uua7paK0
मस्कना वाटते चिंता
2021 साली मस्क यांनी म्हटले होते की, अधिकाधिक मुले जन्माला घातली नाही तर ही संस्कृती नष्ट होईल. ज्या वर्षी मस्क यांनी हे विधान केले होते त्याच वर्षी शिवोनने जुळ्यांना जन्म दिला होता. मस्क यांना कमी लोकसंख्येबाबत सातत्याने चिंता वाटत असते. 2022 साली देखील मस्क यांनी अशाच स्वरुपाची एक पोस्ट केली होती. 20 जून 2024 रोजी देखील मस्क यांनी एक पोस्ट केली होती ज्यात त्यांनी म्हटले होते की युरोपात प्रजनन संकट निर्माण झाले आहे. त्यांनी म्हटले होते की, ही संस्कृती एका झटक्यात किंवा एका स्फोटात संपून जाईल. "
Civilization may end with a bang or with a whimper (in adult diapers) https://t.co/VwK8Sl95qJ
— Elon Musk (@elonmusk) June 20, 2024
वॉल स्ट्रीट जर्नलने काही दिवसांपूर्वी एक बातमी प्रसिद्ध केली होती ज्यात म्हटले होते की, 2013 साली स्पेस एक्समधून राजीनामा देणाऱ्या महिलेने आरोप केला होता की मस्क यांनी तिला अनेकदा त्यांच्यासाठी मुले जन्माला घालण्यासाठी दबाव आणला होता.मस्क यांच्यावर एका इंटर्नने आणि दोन महिला कर्मचाऱ्यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. 2016 साली मस्क यांनी महिला हवाई कर्मचाऱ्याला शारीरिक संबंध ठेवल्यास तुला एक घोडा देईन, असं सांगितलं होतं.
एलन मस्ककडे यांच्याकडे किती संपत्ती आहे
टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) चे सीईओ आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे मालक असलेले मस्क हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार 19 जून 2024 रोजी मस्क यांची एकूण संपत्ती (Elon Musk Net Worth) ही 210 अब्ज डॉलर्स इतकी होती अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीपेक्षा ही संपत्ती 3 अब्ज डॉलर्सने अधिक आहे.
मस्क यांच्या संपत्तीत झालेली वाढ ही त्यांच्या कंपन्यांच्या टेस्ला आणि स्पेसएक्सच्या शेअर्सच्या किमतीत अलीकडेच झालेल्या वाढीमुळे झाली आहे. इलेक्ट्रॉनिक वाहन बनवणारी कंपनी टेस्लाच्या शेअरची किंमत गेल्या महिन्यात 10% पेक्षा जास्त वाढली आहे. तर SpaceX ने नुकताच $125 बिलियन मूल्याचा टप्पा गाठला आहे. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या टॉप-10 यादीमध्ये बर्नार्ड अर्नॉल्ट, मार्क झुकेरबर्ग, बिल गेट्स आणि वॉरेन बफे सारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world