एलॉन मस्कची कंपनी SpaceX चं स्टारशिप प्रक्षेपणानंतर अवघ्या काही मिनिटातच क्रॅश झालं. बोका चिका, टेक्सास येथून उड्डाण केल्यानंतर 8 मिनिटातच स्टारशिपशी संपर्क तुटला. रॉकेटने अंतराळातील त्याच्या सुपर हेवी फर्स्ट स्टेज बूस्टरपासून वेगळे होण्यास सुरुवात केल्यानंतर ही दुर्घटना घडली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्पेसएक्सच्या मिशन कंट्रोलचे कम्युनिकेशन मॅनेजर डॅन ह्युट यांनी लाइव्ह स्ट्रीम दरम्यान सांगितले की, स्टारशिपशी संपर्क तुटण्याचे कारण वरच्या टप्प्यातील विसंगती आहे. या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये स्टारशिपचे तुकडे आकाशात पडताना दिसत आहेत.
स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. एलॉन मस्क यांनी ट्वीट करत लिहिले की, "यश अनिश्चित, मात्र मनोरंजनाची हमी!"
(नक्की वाचा- Mark Zuckerberg : फेसबुक झुकले! मार्क झकरबर्गच्या चुकीच्या वक्तव्याबद्दल कंपनीनं मागितली माफी)
स्टारशिपमध्ये 10 डमी उपग्रह होते, जे स्पेसएक्सच्या स्टारलिंक इंटरनेट उपग्रहांसारखे होते. या उड्डाणाचा उद्देश उपग्रह सुरक्षितपणे सोडणे आणि अंतराळ यानाच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासह विविध चाचण्या घेणे हा होता.
( नक्की वाचा : 'या' गावात आजारी पडण्यावर प्रशासनाकडून बंदी, महापौरांवर निर्णय घेण्याची वेळ का आली? )
स्टारशिपचे हे उड्डाण जगातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली रॉकेट म्हणून महत्त्वाचे आहे. चंद्रावर अंतराळवीर पाठवण्यासाठी नासाने या रॉकेटची निवड केली असून ते मंगळावरही पाठवण्याचे एलॉन मस्क यांचे उद्दिष्ट आहे.