लंडनमधील एका कोर्टाने मारिअस गुस्तावसन याला 22 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मारिअस हा एका गँगचा म्होरक्या होता आणि तो ‘एनंच मेकर' नावाची वेबसाईट चालवत होता. पुरुषांची गुप्तांगे आणि वृषणे कापायची आणि ते व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड करायचे हा मारिअसचा धंदा होता. या अघोरी प्रकारासाठी मारिअसला शुक्रवारी 22 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मारिअसविरोधात खटला चालवण्यात आला होता. सरकारी वकिलांनी आपल्या युक्तिवादात म्हटले होते की पुरुषांची गुप्तांगे कापून त्यांना तृतीयपंथी बनविण्यासाठी मारिअस अत्यंत भयानक पद्धतींचा अवलंब करत होता. जे पुरुष सहमती द्यायचे त्या पुरुषांची मारिअस गुप्तांगे आणि वृषण कापायचा. गुप्तांगे आणि वृषण कापून तृतीयपंथी बनणाऱ्या पुरुषांना नल्लो म्हटलं जातं.
काय होती पद्धत ?
'नल्लो' बनविणाऱ्या प्रक्रियेचा मारिअस व्हिडीओ चित्रीत करत होता. हे व्हिडीओ तो त्याच्या बेवसाईटवर अपलोड करत होता. व्हिडीओसाठीच्या प्रत्येक क्लिकमागे मारिअसला पैसे मिळत होते. या वेबसाईटचे जवळपास 23 हजार फॉलोअर्स होते. 2017 ते 2021 या काळात मारिअसने जवळपास 3 लाख डॉलर्स (अडीच कोटी रुपये) कमावले होते. मारिअसने गेल्या वर्षी 13 गुन्ह्यांची कबुली दिली होती. माणसांना शारिरीक यातना देण्यासाठी कट रचल्याचाही त्याच्याविरोधात आरोप होता.
( नक्की वाचा : कल्याणच्या चप्पल विक्रेत्याचे 'डर'मधील शाहरुखसारखे उद्योग, पोलिसांनी जिरवली मस्ती )
सरकारी वकील कॅरोलिन कारबेरी यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, या प्रक्रियेला पुरुषांनी परवानगी दिली होती आणि परवानगी नंतरच ही कापाकापी करण्यात आली होती. मात्र परवानगी दिली असली तरी त्या व्यक्तीला पराकोटीच्या शारिरीक यातना देणे हे अयोग्य आहे असे कॅरोलिन यांनी म्हटले. सगळे पीडीत पुरुष हे दबावाला बळी पडले होते आणि त्यांच्यावर मारिअस आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दबाव टाकला होता.
मारिअसने 2007 साली स्वत:चे गुप्तांग कापण्यास परवानगी दिली होती. यानंतर 2019 साली त्याने स्वत:चा पाय कापण्यासही परवानगी दिली होती. मारिअसने कापलेला पाय ड्राय आईसमध्ये बुडवून ठेवला होता. या कापा कापीबद्दल दोघांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. सरकारी वकिलांनी म्हटले की मारिअसने कापलेले अवयव फ्रीजमध्ये भरून ठेवले होते. त्याने हे अवयव विकण्याचाही प्रयत्न केला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world