जाहिरात

Shocking News: शेतात चमकलं अन् नशीब बदललं! शेतकऱ्याला सापडलं 36,000 कोटींचे सोनं

Farmer Found Gupt Dhan In Farm: शेतकऱ्याच्या शेतात खजिना सापडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली असून हे धन पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर..

Shocking News: शेतात चमकलं अन् नशीब बदललं! शेतकऱ्याला सापडलं 36,000 कोटींचे सोनं

फ्रान्स: कुणाचे नशीब कधी अन् कसे चमकेल काही सांगता येत नाही. कधीकधी देव एखाद्याला इतकं भरभरुन देतो की त्याला काय करावं हेच सुचत नाही. असाच प्रकार एका शेतकऱ्यासोबत घडला असून त्याला आपल्या शेतात हजारो कोटींचा खजिना सापडला ज्यामुळे एका रात्रीत त्यांचे आयुष्यच बदलून गेले. शेतकऱ्याच्या शेतात खजिना सापडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली असून हे धन पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर..

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

युनियन रिओच्या रिपोर्टनुसार, ही घटना फ्रान्सच्या ग्रामीण भागात घडली. फ्रान्सच्या ऑव्हर्गेनमध्ये राहणारे 52 वर्षीय शेतकरी मिशेल ड्युपॉन्ट गेल्या अनेक वर्षांपासून शेती करत होते. काही काळापूर्वी जेव्हा त्यांनी शेतात खोदकाम सुरू केले. तेव्हा त्यांना आपल्या शेतातील जमिनीखाली काही चमकदार धातू दिसला. सुरुवातीला त्यांना ती एखादी वस्तू असावी असे वाटले. मात्र जेव्हा त्यांनी त्याची तपासणी केली तेव्हा ते खरेखुरे सोने असल्याचे स्पष्ट झाले अन् त्यांना आश्चर्याचा धक्का बसला

 प्राथमिक अहवालांनुसार, जमिनीखाली 100 किलोपेक्षा जास्त सोन्याच्या विटा आणि नाणी सापडली आहेत.  ज्याची आर्थिक मूल्य सुमारे 4.2 अब्ज युरो म्हणजेच 36 हजार कोटी रुपये इतके आहे. आता शेतकऱ्याच्या शेतात सापडलेले 36,000 कोटींचे सोने शेतकऱ्याच्या ताब्यात जाणार की सरकारच्या असा सवाल उपस्थित होत आहे. 

(नक्की वाचा- Bhushan Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश, घेतली पदाची शपथ)

 फ्रेंच कायद्यांनुसार, जर एखादी ऐतिहासिक संपत्ती जमिनीखाली सापडली तर त्यावर सरकारचा अधिकार असू शकतो, परंतु जर ती जमीन खाजगी असेल आणि ती शोधणारी व्यक्ती मालक असेल तर तोही त्यात वाटा मिळवण्याचा हक्कदार असू शकतो. दरम्यान, ही बातमी व्हायरल होताच सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पूर आला. लोक याला 'नशिबाचा खेळ' म्हणत आहेत आणि या शेतकऱ्याला जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती म्हणत आहेत. फ्रेंच सरकारने सध्या हा परिसर सील केला आहे आणि पुरातत्व तज्ञांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. या खजिन्याचा खरा मालक कोण असेल हे येत्या काळात निश्चित होईल.

Baramati News: गुंडांच्या विकृतीने जीव घेतला, 'ती' शाळेत पहिली! निकाल पाहून पालक सुन्न, अख्ख गावं हळहळलं

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com