Joe Biden diagnosed with prostate cancer : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रोस्टेन कॅन्सर बायडेन यांच्या हाडांमध्ये पसरला आहे. जो बायडेन यांच्या प्रवक्त्या केली स्कली यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, 82 वर्षीय जो बायडेन यांना गेल्या आठवड्यात लघवीची समस्या होती. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान त्यांना प्रोस्टेन कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बायडेन यांना आठवड्याच्या सुरुवातीला लघवीची समस्या होत असल्याने डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. नियमित शारीरिक तपासणीत त्याच्या प्रोस्टेटमध्ये एक लहान गाठ आढळून आली. ज्यामुळे पुढील तपास सुरू झाला. शुक्रवारपर्यंत, डॉक्टरांनी प्रोस्टेट कॅन्सरची पुष्टी केली. ज्याच्या पेशी आधीच त्याच्या हाडांमध्ये पसरल्या होत्या.
प्रोस्टेट कॅन्सरचे मूल्यांकन 1 ते 10 च्या ग्लीसन स्कोअरसह केले जाते. जो बायडेन यांचा स्कोअर 9 आहे. याचा अर्थ त्याचा कर्करोग खूप धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. सध्या, बायडेन आणि त्यांचे कुटुंबिया उपचारांच्या पर्यायांचा विचार करत आहेत.
(नक्की वाचा- मुंबईत 2 कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू; इतर गंभीर आजार असल्याचं रुग्णालयाकडून स्पष्ट)
काय आहे प्रोस्टेट कॅन्सर?
त्वचेच्या कॅन्सरनंतर प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लागण होणार कॅन्सर आहे. प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये होणारा एक सामान्य कर्करोग मानला जातो. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, 100 पैकी 13 पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा - Who is Jyoti Malhotra: भारतातून फिरायला गेली, पाकिस्तानची हेर झाली, कोण आहे ज्योती मल्होत्रा?)
डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्वीट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, "जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण झाल्याचे ऐकून दुःख झाले आहे. बायडेन लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो." अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी म्हटलं की, "माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या प्रोस्टेट कॅन्सरबद्दल ऐकून दुःख झाले बायडेन एक योद्धा आहेत. ते ताकदीने या आव्हानाचा सामना करतील."