
Mumbai Corona News : हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशात मुंबईत कोरोना संशयित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने भीतीचं वातावरण आहे. मात्र हे मृत्यू करोनामुळे झाले नसून त्यांना असलेल्या इतर आजारामुळे झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे
केईएम रुग्णालयात रविवारी सकाळी 58 वर्षीय एका महिलेचा तर 13 वर्षीय मुलीचा संशयित कोरोनाने मृत्यू झाला असल्याचे उघडकीस आले आहेत. 58 वर्षीय महिलेला 14 मे रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला असल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे की, या दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोविड-19 मुळे झाला नाही तर कर्करोग आणि मूत्रपिंड निकामी होण्यासारख्या त्यांच्या पूर्वीच्या गंभीर आजारांमुळे झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीत दोघेही पॉझिटिव्ह आढळले होते.
गेल्या तीन महिन्यांत, मुंबईत दरमहा सरासरी 7 ते 10 नवीन कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत, जी संख्या कमी असू शकते. परंतु ती पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नाही. हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या काही आशियाई देशांमध्ये कोरोना संसर्ग पुन्हा वेगाने पसरत आहे.
(नक्की वाचा- Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल)
गेल्या काही दिवसांत मुंबईतील खाजगी रुग्णालयांमध्ये कोविडसारखी लक्षणे असलेले अनेक नवीन रुग्ण आढळले आहेत. ज्यात ताप, खोकला आणि घसा खवखवणे ही सामान्य लक्षणे आहेत. यापैकी काही रुग्ण अलीकडेच परदेश प्रवासावरून परतले आहेत, ज्यामुळे भीतीचं वातावरण आहे.
(नक्की वाचा- देशद्रोही ज्योतीसोबत पाकिस्तानची सफर, आणखी एक युट्यूबर तपास यंत्रणांच्या रडारवर)
घाबरण्याची गरज नाही- आरोग्य विभाग
मुंबई महापालिका आणि आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. जेणेकरून सुरुवातीच्या टप्प्यातच संसर्ग थांबवता येईल. गरज पडल्यास कठोर कारवाई करण्याची तयारीही विभागाने केली आहे. सध्या घाबरण्याची गरज नाही असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र निष्काळजीपणा करू नये विशेष करुन वृद्ध, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले लोक आणि परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांनी काळजी घ्यावी.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world