जाहिरात

हमासचा इस्रायलवर पुन्हा रॉकेट हल्ला, एअर डिफेन्स सिस्टमचं प्रत्युत्तर

तेल अवीवमध्ये या मिसाईल हल्ल्यानंतर एअर सायरन वाजू लागले आहेत, जे एकद्या हल्ल्याचे संकेत देतात. मात्र इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टमने हल्ला धुडकावून लावल्याचा दावा केला आहे. 

हमासचा इस्रायलवर पुन्हा रॉकेट हल्ला, एअर डिफेन्स सिस्टमचं प्रत्युत्तर
तेल अवीव पर फिर हमला

हमासने पुन्हा एकदा इस्रायलमधील प्रमुख शहर 'तेल अवीव'वर मिसाईल हल्ला केला आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सनने याबाबत माहिती दिली आहे.हमासने देखील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तेल अवीवमध्ये या मिसाईल हल्ल्यानंतर एअर सायरन वाजू लागले आहेत, जे एकद्या हल्ल्याचे संकेत देतात. मात्र इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टमने हल्ला धुडकावून लावल्याचा दावा केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अल कसम ब्रिगेडने आपल्या टेलिग्राम चॅनलवरुन दिलेल्या वक्तव्यात म्हटलं की, नागरिकांवरील हल्ल्याच्या उत्तरादाखल हे रॉकेट लॉन्च करण्यात आले आहेत. हमासच्या अल अक्सा टीव्हीने म्हटलं की, रॉकेट हल्ला गाझा पट्टीतून करण्यात आला. मागील चार महिन्यांपासून शांत असलेल्या तेल अवीवमध्ये आज सायरन वाजले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

(नक्की वाचा - 'ती' कोण होती? महिलेसोबत फ्लॅटमध्ये जाताच फसले बांगलादेशचे खासदार, मृतदेहच बाहेर आला)

इस्रायलच्या आपत्कालीन वैद्यकीय विभागने म्हटलं की, यामध्ये कोणत्याही जखमीची माहिती नाही. विनाशकारी युद्धानंतरही इस्लामी संघटना रॉकेट हल्ला करण्यात सक्षम आहेत, असा संदेश यातून देण्यात आल्याचं बोललं जात आहे. 

दक्षिम गाझातील शहर राफा येथून हे हल्ले करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एकूण 60 रॉकेट तेल अवीवच्या दिशेने डागण्यात आले आहेत. मात्र एअर डिफेन्स सिस्टमने हे रॉकेट हवेतच नष्ट केल्याचंही कळतंय. मात्र ज्या हमासमधील लांब पल्ल्यावर हल्ला करणारे रॉकेट नष्ट करण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र या हल्ल्यानंतर इस्रायलची चिंता पुन्हा वाढली आहे. 

(नक्की वाचा - साखरझोपेतच काळाचा घाला! झोपडीत बस घुसल्याने 4 मजुरांचा जागीच मृत्यू)

इस्रायल वारंवार सांगत आहे की, हमासची संपूर्ण सैन्य ताकद आहे ती राफा येथून काम करत आहे. त्यामुळे राफामध्ये इस्रायलने ऑपरेशन सुरु केलं आहे. मागील काही दिवसात जवळपास 8 लाख लोक राफामधून विस्थापित झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हमास-इस्रायल युद्ध पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com