- ईरान के मिनाब में अमेरिकी और इजरायली हमले में प्राइमरी स्कूल की 165 बच्चियों की मौत हुई.
- इन मासूम बच्चियों को बुलडोजर से खोदे गए 165 कब्रों में दफनाया गया है, जिसकी तस्वीरें सामने आई हैं.
- अमेरिकी राष्ट्रपति ट्रंप की भतीजी मैरी एल ट्रम्प ने इस हमले की निंदा करते हुए इसे सही ठहराने की चुनौती दी है.
Iran -Israel America War:
ईराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. दक्षिण ईराणमधील मिनाब येथील एका प्राथमिक शाळेवर झालेल्या भीषण हल्ल्यात 165 चिमुरड्या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. मंगळवारी जेव्हा या चिमुकल्यांना दफन करण्यात आले, तेव्हा त्या दृश्यांनी संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे.
जेसीबीने खोदावी लागली 165 थडगी
मृत मुलींची संख्या इतकी मोठी होती की, मानवी हातांनी थडगी खोदणे कठीण झाले होते. अखेर जेसीबी (JCB) आणि बुलडोझरच्या साहाय्याने एकाच रांगेत 165 थडगी खोदण्यात आली. उंचावरून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये ही थडगी लहान छिद्रांसारखी दिसत असली, तरी प्रत्यक्षात ते त्या चिमुकल्यांचे शेवटचे विश्रामस्थान होते. यावेळी हजारो ईराणी नागरिकांनी अश्रूपूर्ण नयनांनी या मुलींना निरोप दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतणीने उपस्थित केले प्रश्न
या घटनेनंतर अमेरिकेतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुतणी, मेरी एल. ट्रम्प यांनी या थडग्यांचा फोटो शेअर करत थेट आव्हान दिले आहे. "मी कोणालाही आव्हान देते की, त्यांनी या क्रूरतेचे समर्थन करून दाखवावे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
(नक्की वाचा- Iran News: अण्वस्त्र चाचणी की भूकंप? युद्धादरम्यान इराणची जमीन हादरली; जगभरात चिंतेचं वातावरण)




ईराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीही या थडग्यांचे फोटो शेअर करत अमेरिकेवर हल्लाबोल केला आहे. "मिस्टर ट्रम्प यांनी ज्या संरक्षणाचे आश्वासन दिले होते, ते प्रत्यक्षात असे दिसते. गाझापासून मिनाबपर्यंत निष्पापांची निर्घृण हत्या केली जात आहे. या 160 हून अधिक मुलींच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले आहेत," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
जगाचा एकच सवाल: "या मुलांचा काय गुन्हा?"
या भीषण हल्ल्यामुळे जगभरातून इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लष्करी लक्ष्यांच्या नावाखाली शाळा आणि निष्पाप मुलांना लक्ष्य करणे हे युद्ध गुन्ह्याच्या श्रेणीत येते का? असा सवाल मानवाधिकार संघटना विचारत आहेत.
Death toll from US and Israeli strikes in Iran climbs to 787
— RT (@RT_com) March 3, 2026
Farsna footage shows a funeral prayer being held over the bodies of schoolchildren killed in Minab pic.twitter.com/kG30sZLnKi
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world