HMPV हा कोरोनासारखा धोकादायक आहे का? चीनमध्ये काय आहे स्थिती? डॉ. श्रीखंडेंना थेट विचारलं!

भारतात तीन रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

चीनमधील HMPV रुग्णांची संख्या वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. आज 6 जानेवारी रोजी भारतात तीन रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र हा व्हायरस फारसा धोकादायक नसल्याचं सांगितलं जात आहे. काही माध्यमांमध्ये चीनमध्ये HMPV च्या रुग्णांमुळे रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी झाल्याचं सांगितलं जात असलं तरी खरंच अशी परिस्थिती आहे का? याबाबत NDTV मराठीने चीनमधील शांघाय डेल्टाहेल्थ रुग्णालयातील डॉ. अचल श्रीखंडे यांच्याशी संवाद साधला आणि तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डॉ. श्रीखंडे शांघायमधील बड्या रुग्णालयात सेवा देतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शांघायमध्ये HMPV रुग्णांची संख्या फारशी दिसून येत नाही. शिवाय येथे कोणताही प्रोटोकॉल अद्याप जारी केलेला नाही. तसं पाहता नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत येथे संसर्ग आणि इन्फुएंझाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. या काळात साथीचे रोग पसरतात त्यामुळे तसं घाबरण्याचं कारण नाही. चीनमधील शांघायमध्ये अद्यापही मास्कसक्ती करण्यात आली नसल्याचं दिसतं. तर येथील काही नागरिक पूर्वकाळजी म्हणून नियमितपणे मास्क घालत असतात. 

नक्की वाचा - HMPV Update : पुन्हा मास्क, पुन्हा सॅनिटायझर? भारतात HMPV चे 2 रुग्ण, आरोग्य विभागाने जारी केली नियमावली

अमेरिकेत वैद्यकीय सेवा देणारे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितलं की, चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी असल्याने गेली काही वर्षे लहान मुलांना बाहेर फिरताना निर्बंध होते. दरम्यान त्यांची रोगप्रतिकारशक्ती सुधारली नाही. त्यामुळे एक वर्षाखालील बालकांना याची लागण होण्याचं प्रमाण जास्त आढळून येतं. त्याशिवाय वृद्ध आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांनाही या व्हायरसची लागण होते. मात्र भारतीयांना घाबरण्याचं कारण नाही. HMPV मुळे श्वसन यंत्रणेवर परिणाम होतो. मात्र ज्यांना आधीच यासंबंधित त्रास असेल त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. HMPV मध्ये अद्याप तरी अँटीव्हायरस औषध उपलब्ध नाही. 

Advertisement

HMPV ची लागण कोणाला होते?
- लहान बालकं
- वृद्ध
- रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना

HMPVची लक्षणं...
सर्दी आणि खोकला
घशाला खवखव
ताप येणे
श्वास घेण्यास अडथळा
ब्रोंकियोलाइटिस 
न्यूमोनियासारखे गंभीर श्वसनाचे आजार

HMPVचा कुणाला सर्वाधिक धोका
लहान मुलं (5 वर्षांखालील)
वृद्ध
रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे
अस्थमा किंवा सीओपीडी
श्वसनासंबंधित आजाराशी सामना करणारे रुग्ण

HMPVचं निदान कसं कराल?
छातीचा एक्सरे
RTPCR
रॅपिड एन्टीजन टेस्ट (Rapid antigen test)

कसा कराल बचाव?
नियमितपणे हात धुणे
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
खोकताना आणि शिंकताना मास्क वापरा