अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय झाला बदल? कमला हॅरिसमुळे ट्रम्प यांना फायदा की तोटा?

US Election 2024 : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी पुढील निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. बायडेन यांनी अध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस (Kamala Harris ) यांना पाठिंबा देऊन सर्वांनाच धक्का दिलाय.

Advertisement
Read Time: 3 mins
D
मुंबई:

US Election 2024 :  अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी पुढील निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. बायडेन यांनी अध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस (Kamala Harris ) यांना पाठिंबा देऊन सर्वांनाच धक्का दिलाय. अर्थात कमला हॅरीस यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. पण, अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये त्यांचं नाव आल्यानं अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीचं संपूर्ण चित्र बदललंय. कमला हॅरीस यांच्या एन्ट्रीनं रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donalad Trump) यांना फायदा होणार की तोट? हा प्रश्न आता उपस्थित झालाय. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ट्रम्प यांचा खडतर मार्ग

अमेरिकन अध्यक्षपदासाठी 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत कमला हॅरीस डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार असतील तर त्यांचा सहज पराभव करुन, असं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आठवडाभरापूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीनं नवं वळण घेतलं. 

त्यापाठोपाठ बायडेन यांनी माघार घेत हॅरीस यांना पाठिंबा दिल्यानं निवडणुकीचं संपूर्ण चित्र बदललं आहे. 'रॉयटर्स'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कमला हॅरीस यांना अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली तर त्याचा सामना कसा करायचा? यावर ट्रम्प यांची निवडणूक टीम गेल्या काही आठवड्यापासून रणनीती तयार करत आहे.

( नक्की वाचा : एका मिलिसेकंदानं वाचला ट्रम्प यांचा जीव, शेवटच्या क्षणी काय घडलं? स्वत: सांगितला अनुभव )
 

कोणता मुद्दा प्रमुख?

बायडेन यांनी घोषणा करताच ट्रम्प यांनी सीएनएनला सांगितलं की, 'जो बायडेनपेक्षा हॅरीस यांचा पराभव करणे सोपे होईल.' जो बायडेन यांच्या इमिग्रेशन पॉलिसीशी कमला हॅरीस यांना जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न ट्रम्प यांच्या प्रचारातून होईल, असे संकेत मिळत आहे. अमेरिकेच्या दक्षिणेकडील मेक्सिको या देशातून होणाऱ्या लाखो नागरिकांच्या अवैध घुसखोरीला हे धोरण जबाबदार आहे, असा रिपब्लिकन पक्षाचा आरोप आहे. 

Advertisement

ट्रम्प यांच्याकडून या प्रचारात अर्थव्यवस्थेचा मुद्दाही उपस्थित केला जाईल.  खाण्यापिण्याच्या पदार्थांचे वाढलेले दर, इंधनावरील वाढलेलं व्याज यामुळे अमेरिकन नाराज आहेत, असं जनमत सर्वेक्षणातून समोर आलंय.  

ट्रम्प यांनी बदलली रणनीती

डोनाल्ड ट्रम्प यांनी एरिजोना, जॉर्जिया, नेवादा आणि पेंसिल्वेनियामधील निवडणूक रणधुमाळीतील बायडेनविरोधी जाहिराती हटवल्या आहेत. त्याजागी हॅरीस यांच्यावर हल्ला करण्यात आलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या एजन्सींनी रविवारी दिली.  30 सेकंदांच्या या जाहिरातीमध्ये हॅरीस यांच्यावर बायडेन यांचा कमकुवतपणा जनतेपासून लपवण्याचा आरोप करण्यात आलाय.  'जो काम करु शकत नाहीत हे कमला यांना माहिती होतं. त्यांनी सीमेववर आक्रमक, अनियंत्रित चलनदर आणि अमेरिकनं स्वप्नांचा मृत्यू केला आहे,' असा प्रचार या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. 

Advertisement

हॅरीसमुळे होणार बदल?

डेमॉक्रेटीक पक्षानं अद्याप त्यांचा उमेदवार निश्चित केलेला नाही. बायडेन यांच्या पाठिंब्यानंतरही कमला हॅरीस पक्षाच्या उमेदवार असतील याची कोणतीही खात्री नाही. राजकीय विश्लेषकांच्या मतांनुसार, हॅरीस यांना उमेदवारी जाहीर झाल्यास डेमोक्रेटीक पक्षाच्या प्रचारात बदल होईल. त्या 59 वर्षांच्या महिला असून अश्वेत आणि आशियाई-अमेरिकन आहेत. त्यांचा 78 वर्षांच्या ट्रम्पबरोबर वेगळ्या पद्धतीनं लढाई होईल. हॅरिस सध्याचे ज्वलंत विषय आणि सांस्कृतिक विभाजनावर भर देतील.' अर्थात 248 वर्षांच्या अमेरिकेच्या इतिहासात अद्याप एकदाही महिला अध्यक्षांची निवड झालेली नाही, हा इतिहास बदलण्याचं मोठं आव्हान हॅरीस यांच्यासमोर असेल.  

डेमॉक्रेटिक पक्षाचे रणनितीकार रोडेल मोलिनेऊ यांनी सांगिकलं की, 'हॅरीस तरुण तसंच अश्वेत मतदारांमध्ये उत्साह निर्माण व्हावा या पद्धतीनं प्रचार करतील. त्या कॅलिफोर्निया राज्याच्या माजी अ‍ॅटर्नी जनरल होत्या. जनतेच्या न्यायालयात  ट्रम्प यांच्या विरोधात प्रभावीपणे खटला लढण्यासाठी त्यांना या अनुभवाचा उपयोग होईल.' रिपब्लिकन पक्षाचे रणनितीकार चिप फेलकेल यांनीही ट्रम्प यांनी कमला हॅरीस यांना सामान्य उमेदवार समजण्याची चूक करु नये,' असा इशारा दिला आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : ऋषी सुनक यांचा पराभव ब्रिटनमधील भारतीयांनीच केला? )
 

अमेरिकन मतदारांच्या मनात काय?

रॉयटर्स/इप्सोस यांनी 15 आणि 16 जुलै रोजी कमला हॅरीस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संभाव्य मुकाबल्यावर सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणानुसार ट्रम्प आणि हॅरीस दोघंही 44 टक्के पाठिंबा मिळवून बरोबरीत आहेत.