Donald Trump : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात वाचले आहेत. ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या शूटरचं नियोजन पक्कं होतं. ट्रम्प यांचं डोकं त्याचा निशाणा होता. पण, शेवटच्या क्षणी असं काही घडलं की ट्रम्प यांच्या कानालालागून गोळी गेली. त्यांचा जीव वाचला. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांचा जीव कसा वाचला हे सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नेहमीप्रमाणे काम सुरु केलंय. विमानातून उतरतानाा त्यांचा फोटो समोर आलाय. त्यामध्ये ट्रम्प यांचा आत्मविश्वास जाणवत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिलीसेकंदानं वाचला जीव
डोनाल्ड ट्रम्प शनिवारी पेनसिल्वेनियामध्ये एका सभेत भाषण करत होते. त्याचवेळी त्यांच्यावर 20 वर्षांच्या हल्लेखोरनं अनेक गोळ्या झाडल्या. त्यामधील एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागून गेली. ट्रम्प यांनी शेवटच्या मिलिसेकंदमध्ये त्यांचं डोकं खाली केलं नसतं तर त्यांचा कदाचित जीव गेला असता.
या हल्ल्याच्या स्लो डाऊन फुटेजमध्ये ट्रम्प यांच्या कानाजवळून गोळी गेल्याचं दिसत आहे. गोळी चालण्यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांचं डोकं हलवलं होतं. त्यांनी डोकं हलवलं नसतं तर कदाचित गोळी त्यांच्या डोक्याला लागली असते, त्यानं त्यांचा जीव जाण्याची शक्यता होती.
( Donald Trump Attacked VIDEO : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भरसभेत गोळीबार, दोघांचा मृत्यू )
ट्रम्प यांनी डोकं का वळवलं?
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दिशेनं गोळी येण्यापूर्वी डोकं हलवलं होतं. त्यामुळे गोळी त्यांच्या डोक्याला न लागता कानाला लागली. ट्रम्प यांनी याचं कारण सांगितलं आह. ते त्यांच्या सभेतील मोठ्या स्क्रीनवरील अमेरिकेतील अवैध घुसखोरीचे आकडे पाहण्यासाठी डोकं चार्टच्या दिशेनं वळवलं होतं. त्याचवेळी त्यांच्या दिशेनं गोळी आली. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील माजी डॉक्टर रॉकी जॅक्सन यांना याबाबत अधिक माहिती दिल्याचं वृत्त आहे.
'मी ज्या चार्टवर होतो त्यामुळे माझा जीव वाचला. मी त्या चार्टच्या दिशेनं इशारा केला नसता आणि तो पाहण्यासाठी डोकं वळवलं नसतं तर ती गोळी थेट माझ्या डोक्याला लागली असती,' असा अनुभव ट्रम्प यांनी सांगितल्याचं वृत्त आहे.
( नक्की वाचा : नेपाळमध्ये पुन्हा 'ओली सरकार' चीनची चांदी की भारताचा फायदा? )
'आम्ही घाबरणार नाही'
सीएनएननं दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रूथ सोशल' वर पोस्ट केली. 'ज्याचा कधी विचारही केला नव्हता, ते होण्यापासून देवानं वाचवलं आहे. यावेळी आपण सर्वांनी एकजूट राहणं महत्त्वाचं आहे. अमेरिकेनं म्हणून आपली मूळ वृत्ती कायम ठेवा. अप्रवृत्तीचा विजय होणार नाही, याचा निश्चय करा.'
ट्रम्प यांनी पुढं म्हंटलं, 'आम्ही घाबरणार नाही. आणखी लढाऊ होणार. अन्य पीडित आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल संवेदना.' ट्रम्प यांची तब्येत ठीक असल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world