25 दिवस शिल्लक? भारतीय ज्योतिषाने केली तिसऱ्या विश्वयुद्धाची भविष्यवाणी   

कधी होणार तिसरं विश्वयुद्ध? भारतीय ज्योतिषाने सांगितली तारीख...

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

अनेक दशकांपासून तिसरं विश्वयुद्ध कधी होणार याबाबत चर्चा आणि अंदाज व्यक्त केले जात आहेत. पहिल्या दोन विश्व युद्धांमुळे झालेला विनाश अजूनही पुस्तकं, माहितीपट आणि भयंकर विनाशामुळे जगाच्या आठवणीत आहे. त्यामुळे आणखी एक महायुद्धाचा विचार भयानक ठरू शकतो. नास्त्रेदमस आणि बाबा वेंगासह अनेक ज्योतिषांनी तिसऱ्या विश्वयुद्धाबद्दल भविष्य वर्तविलं असलं तरी याची शक्यता अनिश्चचित असल्याचं सांगितलं जात आहे. तरीही वेळोवेळी सोशल मीडियावर अशी 'भविष्यवाणी' वारंवार समोर येते आणि लोकांचं लक्ष वेधते. सध्या भारतीय ज्योतिषी कुशल कुमार यांनी नव्याने केलेली एक भविष्यवाणी चर्चेचा विषय ठरली आहे. 

लिक्डइंगवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कुशल कुमार यांनी मोठा दावा केला आहे. यानुसार, तिसरं विश्व युद्ध काही आठवडे दूर आहे. वैदिक ज्योतिषी असलेले कुशल कुमार एखाद्या घटनेचा अंदाज व्यक्त करताना ग्रहांची स्थिती पाहण्यासाठी चार्टचा उपयोग करतात. त्यांनी 2024 मध्ये जगभरातील हॉटस्पॉट्समध्ये युद्धाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. विशेषत: त्यांनी 8 मे च्या जवळपास कोरिया, चीन-तायवान, मध्य पूर्वेसारख्या भागात युद्धाची परिस्थिती वाढण्याचे संकेत व्यक्त केले होते. ज्यामध्ये इस्त्रायल आणि मध्य पूर्व, युक्रेन-रशिया यांचा समावेश आहे. या घटनांमुळे नाटोलाही चीड येऊ शकते. 

नक्की वाचा - किर्गिस्तानमध्ये काय घडलं? ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढलं?

कुशल कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, काही देशांवर राज्य करणाऱ्या व्यक्तींसाठी महत्त्वाच्या गोष्टींसाठी चिंतेचा सामना करणे कठीण जाऊ शकते. काहींना गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो, यामुळे अस्वस्थ होऊन ते राजीनामाही देऊ शकतील. समकालीन ग्रहांनुसार लक्षात येत की, सैन्य संपूर्ण नियंत्रण आणण्यासाठी पाऊलं उचलू शकतील. 

तिसरं विश्व युद्ध कधी होणार?
कुमार यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मंगळवार 18 जून 2024 रोजी तिसरं विश्व युद्ध होण्यासाठी सर्वात मजबूत ग्रहीय परिस्थिती आहे. यावेळी 10 आणि 29 जून या तारखांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. पंचकुलामध्ये राहणारे कुशल कुमार स्वत:ला ज्योतिषी म्हणवून घेतात. ते विश्व घटनांबाबत भविष्यवाणी करतात. त्यामुळे यासंदर्भातील बातम्या सोशल मीडियावर चर्चिल्या जातात. 

Advertisement