1991 साली सोव्हिएत रशियातून बाहेर पडून अस्तित्वात आलेल्या किर्गिस्तान या देशांमधील घडामोडींमुळे भारत आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं आहे. किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये या दोन्ही देशांमधील हजारो विद्यार्थी मेडिकलचं शिक्षण घेत आहेत. त्यांच्या सुरक्षेचा सध्या गंभीर प्रश्न सध्या निर्माण झालाय. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या राजदूताला विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करा, असा आदेश दिलाय. तर भारत सरकारनं विद्यार्थ्यांनी घरामध्येच राहावं असा सल्ला दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर या विषयावर पोस्ट केलीय. त्यामध्ये त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांनी दूतावासाशी नियमित संपर्कात राहण्याी सूचना केली आहे. बिश्केकमधील परिस्थिती आता शांत होतीय. भारतीय विद्यार्थ्यांवर सरकारचं लक्ष आहे. त्यांनी दूतावासाशी नियमित संपर्कात राहावं असा सल्ला दिलाय. किर्गिस्तानमधील भारतीय दूतावासानं विद्यार्थ्यांना कधीही संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबरही सुरु केलाय. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी भारतीय विद्यार्थ्यांनी 0555710041 नंबर कॉल करावा असं आवाहन भारतीय दूतावासानं केलं आहे.
Monitoring the welfare of Indian students in Bishkek. Situation is reportedly calm now. Strongly advise students to stay in regular touch with the Embassy. https://t.co/xjwjFotfeR
— Dr. S. Jaishankar (Modi Ka Parivar) (@DrSJaishankar) May 18, 2024
नेमंक काय घडलं?
किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये (Kyrgyzstan Bishkek Clash) पाकिस्तानी नागरिक राहात असलेल्या हॉस्टेलवर स्थानिक नागिकांच्या संतप्त जमावानं हल्ला केला. यामध्ये काही पाकिस्तानी विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा वाद कशामुळे झाला याचं नेमतं कारण अजून समोर आलेलं नाही.
काही मीडिया रिपोर्टनुसार 13 मे रोजी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या इजिप्तच्या काही विद्यार्थ्यांचा आणि स्थानिक किर्गिज नागरिकांचा वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात आंदोलन सुरु केलं. काही जणांना अटकही झाली. पण, मुख्य सूत्रधारांना अटक झाली नसल्याचा किर्गिज नागरिकांचा दावा आहे. पाकिस्तानी नागरिक त्यांच्या संतापाचं लक्ष बनले. शुक्रवारी रात्रीपासून त्यांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली.
( नक्की वाचा : 'हिंदू मुली हा लुटीचा माल नाही', पाकिस्तानच्या खासदारानं सरकारला सुनावलं, Video )
सोशल मीडियावर पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. त्यानुसार, त्यांना फ्लॅटमधून बाहेर काढून मारहाण करण्यात आली. मुलींशी गैरवर्तन झालं. हल्लेखोरांनी त्यांचा मोबाईल आणि लॅपटॉपही चोरला. काही विद्यार्थ्यांच्या तर फ्लॅटचा दरवाजा तोडून त्यांना मारहाण करण्यात आली.
विद्यार्थ्यांची मदतीची याचना
सोशल मीडियावर पाकिस्तानी विद्यार्थ्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये ते पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना मदतीची याचना करत आहे. मदत मिळत नसल्यानं त्यांनी मारियम नवाज यांच्यावर टीका केली. पाकिस्तानी न्यूज चॅनलवर स्वत:ची कैफियत मांडताना पाकिस्तानी विद्यार्थीनी रडत होती.
चीन, पाकिस्तान, कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांशी किर्गिस्तानच्या सीमा आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा हा आवडता देश आहे. जवळपास 12 हजार पाकिस्तानी विद्यार्थी किरगिस्तानमध्ये वेगवेगळे मेडिकलचे कोर्स करत आहेत.
( नक्की वाचा : रशियात पुन्हा पुतिनराज! व्लादिमीर पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ )
भारत -किर्गिस्तान संबंध कसे आहेत?
किर्गिस्तान देश 1991 साली अस्तित्वात आला. भारतानं 1992 सालीच या देशाशी राजकीय संबंध प्रस्थापित केले. किर्गिस्तानशी या प्रकारचं नातं जोडणाऱ्या सुरुवातींतच्या देशामध्ये भारताचा समावेश होता. अनेक भारतीय विद्यार्थी देखील किर्गिस्तानमध्ये मेडिकलचं शिक्षण घेत आहेत. भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार सध्या किर्गिस्तानमध्ये जवळपास 17400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world