
पृथ्वीच्या बाहेर देखील जीवसृष्टी आहे का? एलियन आहेत का? हा सामान्यांपासून चित्रपट निर्माते, लेखक आणि वैज्ञानिकांना पडणारा प्रश्न आहे. या विषयावर आजवर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. अनेक थिअरी प्रसिद्ध आहेत. चित्रपटातूनही हे दुसरं जग कसं असेल ते दाखवण्याचा प्रयत्न झालाय. पण, ब्रह्मांडामध्ये एलियन उपस्थित आहेत, असा दावा भारतीय -ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञानं केला आहे.
या विषयातील संशोधनाची दिशा बदलणारं हे संशोधन डॉ. निक्की मधुसूदन आणि केंब्रिज विद्यापीठातील टीमनं केलं आहे. त्यांनी K2-18b नावाच्या एका दूरच्या ग्रहावर एलियनच्या विश्वाची संभाव्य चिन्हं ओळखली आहेत.
नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) यांच्या मदतीनं या टीमनं डाइमिथाइल सल्फाइड (DMS) और डाइमिथाइल डाइसल्फ़ाइड (DMDS) या वायूंचा शोध लावलाय. हे विशेष आहे. कारण हा वायू समुद्रातील शेवाळाच्या मदतीनं तयार होतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डॉ. निक्की मधुसूदन कोण आहेत?
डॉ. मधुसूदन यांचा जन्म 1980 साली भारतामध्ये झाला. त्यांनी वाराणसीमधील बनारस हिंदू विद्यापीठात B.Tech. डिग्री मिळवली. त्यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून पदव्युत्तर पदवी तसेच पीएच.डी. 2009 साली मिळवली. आपल्या सौरमालेच्या बाहेरील ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास करण्याविषयीचा प्रबंध त्यांनी PHD साठी सादर केला होता. ज्यांना एक्स्ट्रासोलर ग्रह म्हंटले जाते.

पीएचडीनंतर त्यांनी एमआयटी, प्रिस्टन विद्यापीठ आणि येल विद्यापीठातील पोस्ट डॉक्टरल संशोधक म्हणून अनेक पदांवर काम केलं आहे. ते 2013 साली केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले. ते सध्या तिथं भौतिकशास्त्र आणि एक्सोप्लॅनेटरी सायन्सेसचे प्राध्यापक म्हणून काम करतात.
( नक्की वाचा : 'आम्ही हिंदूंपेक्षा वेगळे, कलमाच्या आधारावर बनला पाकिस्तान', पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाच्या ओठावर आलं सत्य )
'या' ग्रहांचा केला आहे अभ्यास
डॉ. निक्कू मधुसूदन यांनी हायसीन ग्रहांबाबत संशोधन केले आहे. ज्यांना जीवसृष्टीच्या शोधासाठी ग्रहांचा सर्वोत्तम वर्ग मानले जाते. हायसीन ग्रहांचे वातावरण हायड्रोजयुक्त आहे. त्याच्या खाली महासागर आहे. डॉ. मधुसूदन यांच्या संशोधनात त्यांचे वातावरण, आतील भाग आणि त्यांची निर्मिती यांचा अभ्यास आहे. त्यामध्ये हायसेन जग, उप-नेपच्यून आणि बायोसिग्नेचरचाही समावेश आहे.
त्यांनी 2012 साली 55 कॅनक्री ई नावाच्या एका ग्रहाचा अभ्यास केला होता. हा ग्रह पृथ्वीपेक्षा मोठा आहे. त्याचा आतील भाग कार्बनयुक्त असू शकतो, असं मत व्यक्त केलं होतं. 2014 मध्ये त्यांनी एका टीमचे नेतृत्व केले ज्याने तीन तप्त गुरू ग्रहांमध्ये पाण्याची पातळी मोजली आणि अपेक्षेपेक्षा कमी पाणी आढळले. 2017 मध्ये, तो WASP-19b ग्रहाच्या वातावरणात टायटॅनियम ऑक्साईड शोधणाऱ्या टीमचा भाग होता. 2020 मध्ये, त्याने K2-18b चा अभ्यास केला. त्यामध्ये तेथील पृष्ठभागावर पाणी असू शकते असं त्यांना आढळलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world