Student loan payoff story : 'कर्ज' शब्द उच्चारताच चांगल्या चांगल्यांची दमछाक होते. मात्र या तरुणीने तर कमालच केली. ही तरुण शिक्षणासाठी अमेरिकेत राहते. तिने अवघ्या एका वर्षात तब्बल ८० लाखांचं कर्ज फेडलं. या तरुणीने Students Loan घेतलं होतं. लोन फेडण्यासाठी तिने कोणतीही जादू केली नाही, ना तिला कोणती लॉटरी लागली. केवळ महत्त्वाकांक्षा, जिद्दीच्या जोरावर तिने एक आदर्श निर्माण केला.
अभ्यासासाठी परदेशात जाण्यासाठी मोठं कर्ज घेतलं जातं. मात्र हे लोन फेडताना नाकी नऊ येतं. मात्र या तरुणीने आपल्या शैक्षणिक कर्जाचं ओझं आई-वडिलांवर न टाकता स्वत:च फेडण्याचा निर्णय घेतला. काहीही झालं तरी शिक्षणासाठी घेतलंल १,००,००० डॉलरचं कर्ज ती स्वत:च फेडण्याचं ठरवलं आणि तिने ते करुन दाखवलं.
बाहेरचं खाणं बंद आणि डबल ड्यूटी...(Lifestyle Changes to Repay Huge Student Debt Fast)
हे ध्येय मिळविण्यासाठी ऐश आरामाच्या आयुष्याला राम राम केला आणि साधं जीवन जगण्याचं ठरवलं. बाहेर जाऊन पिझ्झा-बर्गर खाणं तर दूर, तिने शॉपिंग आणि पर्यटनावरही कडक निर्बंध आणले. वर्षभरत ती हॉटेलमध्ये गेली नाही, तिने बाहेर फिरायला जाणंही टाळलं. आपल्या मुख्य नोकरीसह ती वेड्यासारखं अतिरिक्त काम करीत होती. त्यामुळे मुख्य नोकरीतील पगारासह तिला इतर कामाचे अतिरिक्त पैसेही मिळत होते. तिला कायम शैक्षणिक कर्ज दिसत होतं. ती थोडे थोडे पैसे जमा करीत होती. तिने वर्षभर ही शिस्त पाळली.
कर्जातून सुटका मिळावी म्हणून सर्व आनंद त्यागला... (Mental Peace Over Luxury: The Secret to Success)
तरुणीचं म्हणणं आहे की, डोक्यावर कर्जाचं ओझं असेल तर चांगली झोप येत नाही. लग्झरी आयुष्यापेक्षा तिला मानसिक शांतता आणि कुटुंबाचा सन्मान अधिक प्रिय होता. ती पै-पैचा हिशोब ठेवत होती. तिची 'कर्जमुक्ती'ची कहाणी आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. हेतू स्पष्ट आणि निर्धार पक्का असेल, तर केवळ एक वर्षच नाही, तर नशीबसुद्धा बदलता येते.
(वरील माहिती सोशल मीडियावर आधारित आहे. NDTV मराठी याची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करीत नाही.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world