- अयातुल्लाह खामेनेई पर अमेरिका और इजरायल ने वर्षों से चल रहे गुप्त अभियान के तहत हमला किया.
- तेहरान के ट्रैफिक कैमरे और मोबाइल नेटवर्क हैक थे और तेल अवीव व दक्षिणी इजरायल के सर्वर से जुड़े थे.
- ऑपरेशन में हाई तकनीक एल्गोरिदम, AI और ह्यूमन सोर्स की मदद से सुरक्षा पैटर्न की मिनट दर मिनट जानकारी जुटाई गई.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांच्या निधनाने संपूर्ण जगाला मोठा धक्का बसला आहे. हे केवळ एका नेत्याचे निधन नसून, अमेरिका आणि इस्रायलने अत्यंत गुप्तपणे राबवलेल्या एका महाभयंकर 'इनसाईड ऑपरेशन'चा निकाल असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालातून समोर येत आहे. तेहरानच्या अभेद्य सुरक्षा कवचाला छेद देऊन खामेनींपर्यंत मृत्यू कसा पोहोचला, याची इनसाईड स्टोरी जाणून घेऊया. 'फायनान्शिअल टाइम्स' (FT) सह अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या दाव्यानुसार, हा हल्ला केवळ मिसाइल डागण्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे दोन दशकांचे नियोजन आणि हाय-टेक सायबर घुसखोरी होती.
तेहरानचे ट्रॅफिक कॅमेरे आणि इस्रायली सर्व्हर
अहवालानुसार, इस्रायलने तेहरानमधील जवळपास संपूर्ण ट्रॅफिक कॅमेरा सिस्टम अनेक वर्षांपूर्वीच हॅक केली होती. या कॅमेऱ्यांमधील थेट चित्रण नियमितपणे इस्रायलमधील गुप्तचर तळांवर पाठवले जात होते. खामेनींचे कार्यालय आणि निवासस्थान असलेल्या 'पास्टर स्ट्रीट'च्या प्रत्येक कोपऱ्यावर या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जात होती. सुरक्षा रक्षकांचे ड्युटी शेड्यूल्स, गाड्यांचे ताफे आणि खामेनींच्या हालचालींचे सूक्ष्म रेकॉर्ड गोळा केले गेले.
(नक्की वाचा- Crime News: नाशिक हादरलं! विवाहितेचा 2 लाखांत 'सौदा'; इव्हेंटच्या नावाखाली नेलं अन् पुढे भयंकर घडलं)
'पॅटर्न ऑफ लाईफ' आणि AI चा वापर
गोळा केलेल्या प्रचंड डेटावर प्रक्रिया करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि जटिल अल्गोरिदमचा वापर करण्यात आला. याला इंटेलिजन्सच्या भाषेत 'पॅटर्न ऑफ लाईफ' म्हटले जाते. अमेरिकन सीआयए (CIA) कडे इराणच्या अंतर्गत वर्तुळात असा एक खबऱ्या होता, ज्याने खामेनींच्या बैठकीची वेळ आणि ठिकाणाची अंतिम खात्री दिली. हल्ल्याच्या काही वेळ आधी पास्टर स्ट्रीट परिसरातील मोबाईल टॉवर्स जॅम करण्यात आले, जेणेकरून सुरक्षा रक्षकांना कोणतीही चेतावणी मिळू नये.
60 सेकंदांचा खेळ आणि खामेनींचा अंत
जेव्हा खात्री पटली की लक्ष्य अगदी योग्य ठिकाणी आहे, तेव्हा हवेत तासनतास तैनात असलेल्या इस्रायली विमानांनी अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रे डागली. हा हल्ला अवघ्या 60 सेकंदांच्या विंडोमध्ये पूर्ण करण्यात आला. खामेनींच्या सुरक्षा घेऱ्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी जवळपास 30 मिसाइल्सचा वापर करण्यात आला.
(नक्की वाचा- T20 World Cup: ...तर सामना न खेळताच भारत विश्वचषकातून बाहेर होणार? काय आहे ICC चा नियम?)
"तेहरानला जेरुसलेमसारखे ओळखत होतो"
एका इस्रायली गुप्तचर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही तेहरानला जेरुसलेमसारखे ओळखत होतो" याचा अर्थ इराणला वाटत होते की ते सुरक्षित आहेत, पण प्रत्यक्षात त्यांच्या सर्वोच्च नेत्याच्या बेडरुमपर्यंतची माहिती शत्रूच्या हाती होती. या घटनेने इराणचे राजकीय भविष्य पूर्णपणे बदलले असून, जागतिक राजकारणात अमेरिका आणि इस्रायलचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.