Iran News : इस्त्रायली गुप्तहेर कुरुश किवानी याला इराणमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. किवानीवर इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादसाठी काम करण्याचा आरोप आहे. इराणमध्ये इस्लामी दंड कायद्याअंतर्गत (Islamic Penal Code) मृत्यूची शिक्षा दिली जाते. येथे प्रामुख्याने फाशीच्या माध्यमातून मृत्यूची शिक्षा दिली जाते. फाशी देणं मृत्यूदंडाची सर्वसाधारण पद्धत आहे. मार्च २०२६ पर्यंत इराणमध्ये जगभरातील सर्वाधिक फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २०२५ या वर्षात एक हजाराहून अधिक लोकांना फाशी देण्यात आली आहे.
फाशीची शिक्षा कशी दिली जाते?
इराणमध्ये अधिकांश मृत्यूदंड तुरुंगाच्या आत दिला जातो. मात्र काही विशेष प्रकरणात सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली जाते. इतकच नाही तर गंभीर प्रकरणात गुन्हेगारांना गुन्हा केला त्याच जागेवर सार्वजनिकपणे फाशी दिली जाते.
मृत्यूदंडाची शिक्षा कोणत्या गुन्ह्याखाली दिली जाते?
- हत्या,
- बलात्कार,
- लहान मुलांशी छेडछाड
- समलैंगिकता,
- अमली पदार्थांची तस्करी,
- अपहरण,
- दहशतवाद,
- चोरी,
- वेश्यावृत्ती
- विद्रोह,
- धर्मत्याग,
- ईश्वरनिंदा
गुन्ह्यांची चार प्रकारात विभागणी...
इराणमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा इस्लामिक पिनल कोड अंतर्गत दिली जाते. मृत्यूदंडाची शिक्षा दिले जाणारे गुन्हे चार प्रकारात विभागले गेले आहेत.
Qesas (सूड), Hadd (देवाविरुद्धचे गुन्हे), Tazir (जाणूनबुजून केलेले गुन्हे), आणि प्रतिबंधात्मक गुन्हे. (Deterrent Crimes).
UN नुसार, इराणमध्ये २०२५ मध्ये कमीत कमी १५०० लोकांना मृत्यूची शिक्षा देण्यात आली. ज्यामध्ये कमीत कमी ४७ टक्के प्रकरण ड्रग्सशी संबंधित होती. २०२५ मध्ये ३५ वर्षात सर्वाधिक फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. नुकताच इराणमध्ये आंदोलन झालं होतं. जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला कमीत कमी ५२ जणांना फाशी देण्यात आली होती. मानवाधिकार गटांनी याची पुष्टी केली आहे.