Vladimir Putin Warns Oil Flow: इराण आणि इस्रायलमधील युद्ध तसेच जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तेल संकटाबाबत एक अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले आहे. "सध्या जगावर तेलाचं मोठं संकट आहे, त्यामुळे पुढील 30 दिवसांत तेल पुरवठा पूर्णपणे बंद होऊ शकतो," असा इशारा पुतिन यांनी दिला आहे. या विधानामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अर्थव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
होर्मुज सामुद्रधुनीचा महत्त्वाचा प्रश्न
पुतिन यांनी आपल्या विधानामध्ये 'होर्मुज सामुद्रधुनीचा' (Strait of Hormuz) विशेष उल्लेख केला आहे. "होर्मुज सामुद्रधुनीतून तेलाचा पुरवठा करणे आता अतिशय कठीण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून होणारी तेल वाहतूक बंद होणार," असे पुतिन यांनी स्पष्ट केले. होर्मुज सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग मानला जातो.
(नक्की वाचा: India Gas Crisis: मुंबईसाठी पुढील 72 अत्यंत महत्त्वाचे! युद्धाची झळ मुंबईकरांच्या ताटापर्यंत, नेमकं काय घडतंय?)
जगावर महागाईचे सावट?
पुतिन यांच्या दाव्यानुसार, जर पुढील एका महिन्यात तेल पुरवठा विस्कळीत झाला तर त्याचा थेट परिणाम इंधनाच्या दरांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच महागाईने होरपळत असलेल्या देशांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः आशियाई आणि युरोपीय देशांची चिंता वाढली आहे, जे आखाती देशांतून होणाऱ्या तेल आयातीवर अवलंबून आहेत.
पुतिन यांच्या विधानाचा अर्थ काय?सध्या जगासमोर असलेल्या विविध संकटांमध्ये आता 'तेल टंचाई' हे सर्वात मोठे आव्हान ठरू शकते, असे संकेत रशियाने दिले आहेत. आगामी 30 दिवस जागतिक ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, इतर देश यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world