Khamenei Death: आधी सिगारेट शिलगावली, आता चिअर्स; सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर इराणी तरुणी इतक्या आनंदी का? 

गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक आणि धार्मिक जाळ्यात अडकलेल्या इराणी महिलांच्या स्वातंत्र्याची सुरुवात आहे का, अशीही चर्चा सुरू आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Women Cheers After Khamenei Death : इराणमधून आलेले दोन फोटो तेथील सामाजिक परिस्थितीत दर्शवित आहे. आता इराणमधून  सेलिब्रेशनचे फोटो समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये एक इराणी तरुणी देशाचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांचा फोटो जाळून त्याने सिगारेट पेटवत होती. या फोटोतून इराणच्या महिलांचा राग आणि सत्तेविरोधात बंडखोरीचं प्रतिक मानलं गेलं. आता खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच महिला चिअर्स म्हणत सेलिब्रेशन करताना दिसत आहे. या फोटोमुळे जगभरात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक आणि धार्मिक जाळ्यात अडकलेल्या इराणी महिलांच्या स्वातंत्र्याची सुरुवात आहे का, अशीही चर्चा सुरू आहे. 

पहिला फोटो व्हायरल झाला तेव्हा इराणमध्ये महिलांच्या अधिकारांसाठी आंदोलन सुरू होती. हिजाब नियम आणि सामाजिक निर्बंधांविरोधात उभ्या राहिलेल्या माहिलांनी खुलेपणाने सत्तेचा विरोध केला होता. खामेनेई यांचा फोटो जाळून त्यातून सिगारेट पेटवणं केवळ प्रतिकात्मक विरोध नव्हता, तर भीतीची भिंत तुटल्याचे संकेत मानले गेले होते. 

आता दुसऱ्या फोटोमध्ये महिला चिअर्स करीत सेलिब्रेट करीत आहेत. हे सेलिब्रेशन खामेनेई यांच्या मृत्यूनंतरचा असल्याचं मानलं जात आहे. सोशल मीडियावर हे फोटो लाखो वेळा शेअर करण्यात आले आहेत. 

इराणमधील महिलांचा संघर्ष जागतिक मुद्दा कसा बनला?

गेल्या अनेक वर्षांपासून इराणमध्ये महिलांचे अधिकार हा सर्वात मोठा राजकीय आणि सामाजिक मुद्दा ठरला आहे. ड्रेस कोड, सार्वजनिक जीवनात निर्बंध आणि मोरल पोलिसिंग विरोधात सातत्याने आंदोलनं होत आहेत. अनेकदा आंदोलनं कडकपणे दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधाचा आवाज ते पूर्णपणे संपवू शकले नाहीत. 

Advertisement

खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमधील महिला स्वतंत्र होतील?

कोणत्याही एका नेत्याच्या मृत्यूनंतर सामाजिक क्रांतीची गॅरेंटी दिली जाऊ शकत नाही. मात्र ही सत्तेतील बदलाची सुरुवात असू शकते. इराणमधील महिलांच्या अधिकारांचा प्रश्न केवळ नेतृत्व नाही, तर कायदा, धार्मिक संस्था आणि राजकीय संतुलनाशी संबंधित आहे. 

हा फोटो महिलांच्या आंदोलनावेळीचा आहे. हा फोटो इराणच्या सामाजिक पद्धतीवर महिलांचा सांकेतिक विरोध मानला जात आहे.

इराणमधील महिलांचे प्रश्न थोडक्यात...

१ इराणमध्ये हिजाब सक्तीचा कायदा आहे. इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणं अनिवार्य आहे. हिजाब न वापरणाऱ्या महिलांना १० ते १५ वर्षांपर्यंत कारावास, प्रचंड दंड आणि कोठड्यांची शिक्षा होऊ शकते. हिजाब योग्यरित्या न घातल्याने नैतिकता पोलीस महिलांना अटक करतात, त्यांच्याकडून दंड आकारतात. काही दिवसांपूर्वी नैतिकता पोलिसांनी महिलेवर मेट्रोल हल्ला केला होता. यात ती गंभीर जखमी झाली होती. यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इराणमध्ये महिलांनी मोठं आंदोलन पुकारलं होतं. 

Advertisement

२ हिजाबच्या नियमांचं पालन न करणाऱ्या विद्यार्थिनीनं शाळा आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जात नाही. 

३ इराणमध्ये अनेकदा महिलांना उच्च पदावर काम करण्यापासून रोखलं जातं. 

४ इराणच्या कायद्यानुसार, महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी अधिकार आहेत. 

५ महिलांची साक्ष न्यायालयात पुरुषांच्या साक्षीपेक्षा कमी मानली जाते. 

६ विवाहित महिलेला परदेश प्रवास करायचा असल्याच्या पतीची लेखी परवानगी घ्यावी लागते. 

७ घटस्फोट प्रकरणातही महिलांना मुलांचा ताबा देण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.