Israel attacks Syria: इस्रायलचा सीरियावर जोरदार बॉम्बहल्ला, थेट प्रक्षेपणादरम्यान अँकर पळाली, Video

Israel attacks Syria:  इस्रायली सैन्याने बुधवारी दक्षिण सीरियामध्ये हल्ले केले आहेत. यापैकी एका हल्ल्याचा एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Israel attacks Syria:  इस्रायली सैन्याने बुधवारी दक्षिण सीरियामध्ये हल्ले केले आहेत. यापैकी एका हल्ल्याचा एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. तो खूपच धक्कादायक आहे. हा व्हिडिओ त्यावेळी समोर आला जेव्हा इस्रायलने सीरियाच्या लष्करी मुख्यालयाला लक्ष्य केले. या हल्ल्यादरम्यान एक न्यूज रिपोर्टर घाबरून इकडे तिकडे धावू लागते. इस्रायलने सलग तिसऱ्या दिवशी सीरियावर हल्ला केला आहे. तसेच, दक्षिणेकडील स्वेदा शहरात सरकारी सुरक्षा दले आणि स्थानिक लढवय्यांमध्ये चकमकी झाल्याचेही वृत्त आहे.

आणि अँकर पळाली....

याबाबतच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात राजधानी दमास्कसच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीला लक्ष्य करण्यात आले. अँकर बातमी वाचत असतानाच, पार्श्वभूमीत स्फोट झाल्याचे दिसते. त्यानंतर कॅमेरा हलतो आणि न्यूज अँकर आपल्या जागेवरून उठून सुरक्षित ठिकाणी जाते. हल्ल्यानंतर पार्श्वभूमीत धुराचे मोठे लोट उठलेले दिसतात.

सीरियावर हल्ले का होत आहेत?

इस्रायली सैन्याने दमास्कसमधील सीरियन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हल्ला केला आणि काही तासांनंतर त्याच ठिकाणी मोठा हल्ला केला. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या चकमकींनंतर, इस्रायलने दक्षिण सीरियातील सरकारी दलांच्या ताफ्यावर अनेक हवाई हल्लेही केले आहेत. सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी ड्रुझ-बहुल स्वेदा प्रदेशातील मिलिशियावर मंगळवारी झालेल्या युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. यामुळे सीरियाई सैन्याने प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला.

( नक्की वाचा : Nimisha Priya: कोणत्या कारणामुळे टळली निमिषाची फाशी? शेवटच्या क्षणी काय घडलं? वाचा Inside Story )
 

Advertisement
Topics mentioned in this article