इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता अधिक भीषण वळणावर पोहोचला असून, इराणची राजधानी तेहरानमध्ये निसर्गाचा एक भयानक आविष्कार पाहायला मिळत आहे. इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये चक्क 'तेलाचा पाऊस' पडत असून संपूर्ण शहर काळ्या धुराच्या विळख्यात अडकले आहे.
इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता केवळ क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित राहिले नसून, त्याचे पर्यावरणावरही गंभीर परिणाम होऊ लागले आहेत. रविवारी तेहरानमध्ये पडलेल्या पावसाने नागरिकांची झोप उडवली आहे. हा पाऊस पाण्याचे थेंब नसून तेलाचे अंश घेऊन आला आहे, ज्यामुळे शहरातील इमारती, वाहने आणि रस्ते काळे पडले आहेत.
तेहरानचे 'तेल डेपो' लक्ष्य
शनिवारी रात्री इस्रायली हवाई दलाने इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या इंधन साठवणूक केंद्रांना लक्ष्य केले. ईशान्य तेहरानमधील अघदासिए तेल गोदाम, शहारन ऑईल डेपो आणि कारजमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात 4 टँकर चालकांचा मृत्यू झाला असून, लागलेली आग विझवण्यासाठी अनेक तास लागले. या आगीतून निघालेल्या प्रचंड काळ्या धुरामुळे आकाशात ढग जमा झाले आणि त्यातून 'तेलाचा पाऊस' पडला.
(नक्की वाचा- रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी इराणच्या रेड क्रिसेंट सोसायटीने नागरिकांसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने बहारीनमधील एका पाणी शुद्धीकरण प्रकल्पाला ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. बहारीनमध्ये अमेरिकेचे पाचवे नौदल आरमार असल्याने इराणने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी अमेरिकेने इराणच्या केशम बेटावरील अशाच एका प्रकल्पावर हल्ला केला होता.आरोग्य धोक्यात
या पावसात हायड्रोकार्बन, सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड्सचे प्रमाण जास्त असल्याने तो अत्यंत विषारी आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये, खिडक्या ओल्या कापडाने बंद कराव्यात आणि पावसाच्या संपर्कात आलेली कपडे त्वरित बदलावीत.
यामुळे श्वसनाचे त्रास आणि त्वचेची जळजळ होऊ शकते.इराणचा बहारीनवर पलटवार