Iran News: खामेनेईचा खात्मा कसा झाला? 20 बॉम्बचा वर्षाव अन् अंगावर काटा आणणारी दृष्य,पाहा Video

खामेनेई गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेला, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांना उघड आव्हान देत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे
  • खामेनेई यांच्या निवासस्थानावर २० शक्तिशाली बॉम्ब टाकण्यात आले असून परिसर उद्ध्वस्त झाला आहे
  • हल्ला गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटे खामेनेई यांच्या निवासस्थानावर 20 शक्तिशाली बॉम्ब टाकण्यात आले. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे इराणमधील 36 वर्षांपासून सुरू असलेल्या खामेनेई यांच्या सत्तेचा अंत झाला आहे. यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. सॅटेलाइट फोटोंमध्ये खामेनेई यांचा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यात आधीचं त्याचं घर आणि हल्ला झाल्यानंतर त्याचं घर याची छायाचित्र आता समोर आली आहेत. 

ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा 86 वर्षीय खामेनेई आपल्या कार्यालयात एका महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त होते. इस्रायलने या मोहिमेसाठी अत्यंत अचूक आणि शक्तिशाली बॉम्बचा वापर केला होता. जेणेकरून लक्ष्याला वाचण्याची कोणतीही संधी मिळू नये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ'वर पोस्ट करून या वृत्ताला दुजोरा दिला. त्यानंतर इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनीही खामेनेई यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यामुळे इराण मधीला खामेनेई युगाचा अंत झाला आहे. 

नक्की वाचा - Ayatollah Ali Khamenei: मोठी बातमी: इराणचे सुप्रीम लीडर यातुल्ला अली खामेनेईंचा मृत्यू; मीडियाचा दावा

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रहार केला आहे. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनेई यांचा त्यांच्याच घरात खात्मा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामेनेई यांच्या कंपाउंडवर एकामागून एक 20 बॉम्ब डागण्यात आले. हल्ल्यापूर्वीचं आणि हल्ल्यानंतरचं भीषण दृश्य सॅटेलाइट फोटोंनी जगासमोर आणलं आहे. जिथे डौलदार इमारती होत्या, तिथे आता फक्त ढिगारा उरला आहे.

US-इस्रायल हल्ल्यानंतर रिकामं झालं इराणचं आकाश, मिनिटांतच गायब झाल्या अनेक फ्लाईट्स, थक्क करणारा व्हिडीओ

खामेनेई गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेला, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांना उघड आव्हान देत होते. गेल्या वर्षी त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला झाला होता, तरीही त्यांची जिद्द कमी झाली नव्हती. मात्र, शनिवारी पहाटे इस्रायलला खामेनेई यांच्या लोकेशनची अचूक माहिती मिळाली आणि क्षणात खेळ संपला. इराणच्या मीडियाने खामेनेई 'शहीद' झाल्याचं जाहीर करत देशाला मोठा धक्का दिला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Israel attacks Iran: बॉलिवूडची अभिनेत्री दुबईत अडकली! PM मोदींकडे विनंती; भयानक परिस्थिती सांगितली

परदेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, खामेनेई आपल्या निवासस्थानी बैठकीत असल्याची खात्रीशीर माहिती इस्रायली गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या यशाबद्दल अधिकृतपणे माहिती दिली आहे. इराणमधील स्थानिक परिस्थिती आता तणावपूर्ण असून, या हल्ल्यानंतर आखाती देशांमधील युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.