जाहिरात
This Article is From May 07, 2024

रशियात पुन्हा पुतिनराज! व्लादिमीर पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

व्लादिमीर पुतिन यांनी आज 7 मे रोजी पुन्हा एकदा रशियाच्या राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली आहे.

रशियात पुन्हा पुतिनराज! व्लादिमीर पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ
मॉस्को:

व्लादिमीर पुतिन यांनी आज 7 मे रोजी पुन्हा एकदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियामध्ये झालेल्या निवडणुकीत पुतिन रेकॉर्डतोड मतांनी विजयी झाले आहेत. 

पुतिन यांना रशियात झालेल्या निवडणुकीत 87 टक्के मतदान झालं आहे. आजपासून त्यांनी आपल्या पाचव्या टप्प्याच्या कार्यकाळाची सुरुवात केली आहे. पुढील सहा वर्षांसाठी ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदावर असतील. रशियात आयोजित केलेल्या शपथ सोहळ्याला संयुक्त राज्य अमेरिकेसह पश्चिमेकडील अनेक देशांना बहिष्कार टाकला आहे. 

मॉस्कोच्या ग्रँड क्रेमलिन पॅलेसमध्ये पुतिन यांनी 33 शब्दांची शपथ घेतली. येथेच रशियाच्या झार यांच्या तीन राजांचा राज्यभिषेक झाला होता. पुतिन यांनी 2000 साली पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती. यानंतर 2004, 2012, 2018 मध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती. 1999 पासून पुतिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ सांभाळत आहेत. युक्रेनमध्ये हजारो सैनिकांना पाठवल्यानंतर दोन वर्षांच्या अधिक कार्यकाळानंतर ते आपल्या नव्या कारकिर्दीची सुरुवात करीत आहेत. 

नक्की वाचा - लंडन महापौर निवडणुकीला भारत-पाकिस्तान मॅचचं स्वरुप का आलंय?

पुतिन यांच्या भाषणातील ठळक गोष्टी...

- राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पुतिन आपल्या भाषणात म्हणाले, पश्चिमेकडील देशांशी बातचीत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यांना आमच्याशी  संवाद साधायचा की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. 

- पश्चिमेकडील देशांनी सातत्याने रशियातील विकास रोखण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्षे ते आमच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. 

- युरोप आणि आशियातील सहकारी देशांसोबत मिळून आम्ही मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरसाठी काम करीत राहू. सर्व देशांकडे एकसारखी सुरक्षा व्यवस्था असावी अशी आमची इच्छा आहे.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com