Labubu Doll : एका बाहुलीने व्यावसायिकाचं नशिबच बदललं. चीनमधील खेळणी निर्माता पॉप मार्ट इंटरनॅशनल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ वांग निंग यांना एका बाहुलीने अब्जाधीश बनवलं आहे. वांग निंग हे पहिल्यांदाच चीनच्या टॉप टेन अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. कारण कंपनीच्या लाबुबू बाहुल्यांची आशिया, युरोप आणि अमेरिकेतील लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे.
फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार , वांग निंग आता चीनमधील 10 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत . पॉप मार्टमधील हिस्सेदारीवर आधारित 22.7 अब्ज डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीसह, 38 वर्षीय वांग हे देशातील सर्वात तरुण उद्योजकांपैकी एक आहेत.
(नक्की वाचा- Viral Video : 2.67 लाख पगार अन् खर्च फक्त 40 हजार; मुंबईकर तरुणीच्या खर्चाचा तपशील पाहून सगळेच चकीत!)
सोशल मीडियावर 'लाबुबू डॉल' एक विचित्र दिसणारी बाहुली धुमाकूळ घालत आहे. मोठे डोळे, टोकदार दात आणि राक्षसी हास्य असलेली ही बाहुली इतकी प्रसिद्ध झाली आहे की तिची किंमत लाखो रुपयांपर्यंत पोहोचली आहे. खरंतर, लाबुबू हे एक काल्पनिक पात्र आहे, जे 2015 मध्ये हाँगकाँगच्या कलाकार कासिंग लंगने तयार केले होते, जे परीकथांपासून प्रेरित आहे. त्याचा लूक जितका भयानक आहे तितकाच तो गोंडस आणि स्टायलिश मानला जातो आणि ही त्याची सर्वात मोठी खासियत आहे.
'ब्लाइंड बॉक्स' आयडिया
लाबुबुला चिनी कंपनी पॉप मार्टने खऱ्या अर्थाने प्रसिद्धी दिली. 2019 मध्ये कंपनीने ते 'ब्लाइंड बॉक्स' स्वरूपात विकण्यास सुरुवात केली. म्हणजेच ही बाहुली एका बॉक्समध्ये विकली जाते पण बॉक्सच्या आत कोणती बाहुली बाहेर येईल हे माहित नसते. अशा परिस्थितीत लोक 'लकी ड्रॉ' प्रमाणे ते खरेदी करताक. जोपर्यंत त्यांना त्यांच्या पसंतीची लाबुबु सापडत नाही तोपर्यंत ते हे ब्लाइंड बॉक्स पुन्हा पुन्हा खरेदी करतात. बॉक्स उघडण्याचा उत्साह आणि नंतर त्यातून आपली आवडती बाहुली बाहेर आल्याचा आनंद, यामुळे लाबुबु बाहुलीची लोकप्रियता झपाट्याने वाढली.
(नक्की वाचा- Who is Leena Tewari: घर नव्हे ताजमहाल! मुंबईतील फ्लॅटची 639 कोटींना विक्री, मालकीण लीना तिवारी आहेत तरी कोण?)
1.2 कोटी रुपयांची एक बाहुली
बीजिंगमध्ये 131 सेमी उंच लाबुबु बाहुलीचा लिलाव 1.08 दशलक्ष युआन म्हणजेच सुमारे 1.2 कोटी रुपयांना झाला. इतकेच नाही तर त्याच्या लहान बाहुल्या देखील लाखो रुपयांना विकल्या जात आहेत. यावरून लाबुबु बाहुलीच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाईल. लबुबु बाहुलीला रिहाना, डुआ लिपा, ब्लॅकपिंकच्या लिसा, अनन्या पांडे आणि डेव्हिड बेकहॅम यांसारख्या सेलिब्रिटींनी पसंती दर्शवली आहे.
(नक्की वाचा- Home Buying: घर खरेदी करताय? मग ही बातमी नक्की वाचा अन् वाचवा लाखो रुपये)
वांग निंग यांची संपत्ती आणि यश
लाबुबुच्या जागतिक लोकप्रियतेमुळे वांग निंग यांची संपत्ती झपाट्याने वाढली. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीश यादीत, जून 2025 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 22.7 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 1.9 लाख कोटी रुपये इतकी होती. ज्यामुळे ते चीनमधील दहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात तरुण अब्जाधीश बनले. 2024 मध्ये पॉप मार्टने 1.8 अब्ज डॉलरची कमाई केली, ज्यामध्ये लाबुबुच्या 'द मॉन्स्टर्स' मालिकेचा वाटा 726.6 टक्के वाढीसह सर्वाधिक होता. कंपनीच्या हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजवरील शेअर्सची किंमत 2025 मध्ये तिप्पट झाली आणि कंपनीचे बाजार मूल्य 365 अब्ज हाँगकाँग डॉलर इतके झाले.